छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवर आधारीत फर्जंद, फतेशिकस्त, पावनखिंड आशा चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता अंकित मोहन सध्या आपल्या मुलाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते खूप कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये दिसते की, अंकित त्याचा ७ महिन्याचा मुलगा रुआनला शिवाजी महाराजांना मुजरा करायला शिकवत आहे. तसेच व्हिडिओच्या अखेरीस ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
अंकित आणि त्याची पत्नी रुची यांना ७ डिसेंबर २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)