‘लय भारी’ फेम रितेश देशमुख आता आगामी काळात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याची घोषणा त्याने आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर केली आहे. त्याने ‘वेड’ या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले आहे. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.
रितेशने त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये त्याने अभिनेता सलमान खानचेही आभार मानले आहेत. त्याने सलमानबद्दल म्हटलंय की, माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी लयभारी साथ दिली होती, आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक वेडं केलंय.’ असे असले तरी रितेशने सलमानने नेमकी काय मदत केली आहे, हे स्पष्ट केलेले नाही.
Love you Bhau @BeingSalmanKhan #वेड @geneliad pic.twitter.com/nyiw1Zc8qH
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 10, 2022
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)










