Tuesday, January 20, 2026
Home मराठी मोठी बातमी! ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मात्याच्या कारचा अपघात

मोठी बातमी! ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मात्याच्या कारचा अपघात

मंगेश देसाई (Mangesh Desai) हे मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटापासून ते चांगलेच चर्चेत आले होते. मात्र सध्या ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले असून अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे. या अपघातात मंगेश देसाई यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या बातमीने त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. 

अभिनेते आणि निर्माते आपल्या कुटूंबियांसोबत कर्जतला जात असताना वाशी कोकण भवन भागात त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. गाडीला पुढच्या भागाचे नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका मंगेश देसाई यांना बसला आहे. या अपघाताच्या बातमीनंतर मंगेश देसाई यांचे चाहते चिंतेत पडले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

दरम्यान निर्माते आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगेश देसाई यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर ते सर्वत्र चर्चेत आले होते. मंगेश देसाई यांनी मराठी सिने जगतातील अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा