मागील १५ दिवस सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण विठूरायाच्या नामात दंग होते. काहींनी सोशल मीडियावरून, तर काहींनी प्रत्यक्षात दिंडीत सहभागी होऊन वारीचा आनंद घेतला. यामध्ये मराठीतील प्रसिद्ध कलाकार प्राजक्ता माळी, प्राजक्ता गायकवाड, स्पृहा जोशी, स्वप्निल जोशी यांनीही थेट वारीत जाऊन वारकऱ्यांशी संवाद साधला आणि अनुभव घेतला. यादरम्यान अनेक कलाकारांनी फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. मात्र, आता मराठी हास्य अभिनेता कुशल बद्रिके याचा एक भावूक व्हिडिओ चर्चेत आहे.
कदाचित अनेकांना माहिती नाही, पण विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती या गाभाऱ्यात नाहीयेत. चंद्रभागेच्या तीरावर आल्यानंतर भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी एका गाभाऱ्यात आणि रखुमाईच्या दर्शनासाठी दुसऱ्या गाभाऱ्यात जावे लागते. अनेकांना असा प्रश्न पडतो की, विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती वेगवेगळ्या गाभाऱ्यात का आहेत. असाच प्रश्न अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याला पडला, तेव्हा त्याने याविषयीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कुशल बद्रिके याने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे की, “लहानपणीची आठवण तुमच्यासोबत शेअर करतो. मी अवघा दहा एक वर्षाचा होतो. माझ्या घरी आई-बाबांच छोटंसं भांडण झालं. बाबांना सकाळी लवकर ऑफिसमधून लवकर जायचं असतं, पण आईला सर्व आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. त्यामुळे बाबांचंही जागरण व्हायचं आणि त्यांना झोपायला उशीर व्हायचा आणि बाबांची चिडचिड व्हायची. मग बाबांनी ठरवलं की, आमच्या घराला लागून एक छोटीशी खोली होती. बाबा तिथं वेगळं झोपतील, पण मला ते मान्य नव्हतं. मला ती गोष्ट त्रास देत राहिली. आई-बाबांना असे वेगळे पाहणे मला सहन झाले नाही. मग मी हट्टला पेटलो आणि बाबांनी हात टेकले. ते पुन्हा आमच्याबरोबर झोपायला लागले.”
View this post on Instagram
“काही वर्षांनी कार्यक्रमासाठी पंढरपूरला जाणं झालं, आणि विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो, तेव्हा मला कळलं. विठ्ठल आणि रुक्मिणी हे एकाच गाभाऱ्यात राहत नाही, दोघांचेही गाभारे वेगळे आहेत. मंदिर एकच आहे. ते मला बघून लहानपणीची आठवण आली. ती गोष्ट तिथपर्यंत नेऊन गेली. त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी वेगवेगळे आहेत, ही गोष्ट माझ्या मनात घोंगावत राहिली,” असे व्हिडिओत पुढे म्हणत कुशलला सुचलेली कविता त्याने ऐकवली.
कुशल त्याच्या कवितेत सांगतो की, “विठ्ठल घावंना अशी म्हण रखुमाई.” कुशलची ही कविता चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांना भावली आहे. हास्य अभिनेत्री श्रेय बुगडे हिनेही कमेंट करत म्हटले की, “व्वा! खूप कमाल रे. तुला सुचतच एकदम भारी.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “कुशल तू शानदार पद्धतीने तुझ्या भावना मांडल्या आहेत.”
कुशलच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा ३ जून, २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भिरकीट’ या सिनेमात झळकला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘टाईमपास ३’ फेम प्रथमेश परबचे अभिनेत्री कृतिकाबरोबरचे फोटो वेधतायेत लक्ष
रणवीर सिंग बनला शाहरुख खानचा शेजारी, केले ‘इतक्या’ कोटींचे घर खरेदी
पारस छाबराने शाळेत असतानाच केली होती मॉडेलिंगला सुरुवात, पहिल्याच शोमध्ये मिळवले विजेते पद