Thursday, August 7, 2025
Home मराठी बाबो! आर्चीच्या हॉट वर्कआऊट व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड, ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल थक्क

बाबो! आर्चीच्या हॉट वर्कआऊट व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड, ट्रान्सफर्मेशन पाहून व्हाल थक्क

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेला चित्रपट कोणता असे विचारले तर प्रत्येकाच्याच तोंडात सैराट चित्रपटाचे नाव येते. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंंचीवर नेऊन ठेवले. सैराट चित्रपटाने जितकी कमाई केली तितकीच काही कलाकारांना अभिनय जगतात नवी ओळख ही मिळवून दिली. यामधीलच अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सैराटमध्ये डॅशिंग आर्चीच्या भूमिकेत असलेल्या रिंकूने सध्या आपल्या फिटनेसने सर्वांनाच थक्क केले आहे. 

रिंकू राजगुरू ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सैराट चित्रपटातून घराघरात लोकप्रियता मिळालेली रिंकू सध्या अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. अभिनय जगतात काम करतानाच रिंकूने आपल्या फिटनेसकडेही चांगलेच लक्ष दिलेले दिसत आहे. सध्या तिचा असाच एक वर्कआउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामधील रिंकूचा फिटनेस आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी  घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या वाय नावाचे चॅलेंज व्हायरल होत आहे. ज्यामधून विविध कलाकारांना अनेक आसने करायला सांगितली जात आहेत. अशाच प्रकारचे आसन अभिनेत्री रिंकू राजगुरू करताना दिसत आहे. अत्यंत सफाईदारपणे हे आसन केल्याने नेटकरीही थक्क झाले आहेत. तसेच या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी रिंकूच्या या मेहनतीचे कौतुक केले आहे, तर अनेक जण तिचा फिटनेस पाहून थक्क झाले आहेत.

 

 

दरम्यान अलिकडेच अभिनेत्री रिंकू राजगुरूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने एसिड पिडीत मुलीची भूमिका साकारली होती. या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेबद्दल रिंकू राजगुरूचे जोरदार कौतुक करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग पडली ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रणवीर कधीही विसरणार नाही असा वाढदिवस दीपिकाने केलाय साजरा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘जगात भारी’

लग्नानंतर कुठंच दिसली नाही, प्रेग्नंट तर नाही? लाईमलाईटपासून दूर झालेल्या कॅटरिनाबाबत प्रश्नांचा भडीमार

हे देखील वाचा