टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी १२’ सुरू झाला आहे. प्रेक्षकांना हा शो खूप आवडतो, त्यामुळे हा शो सतत नवीन सीझनसह पुनरागमन करतो. यावेळी शोमध्ये स्पर्धक धमाकेदार परफॉर्म करत आहेत. काहींना स्टंटची भीती वाटते, तर काही सहजपणे ते दूर करतात. हा शो बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) होस्ट करत आहे. आता या शोचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जन्नत झुबेर (Jannat Zubair) आणि राजीव अडातिया दिसत आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत शोमध्ये अनेक स्टंट दाखवण्यात आले आहेत. कधीकधी स्पर्धकांना शो होस्ट रोहित शेट्टीचे आव्हानही स्वीकारावे लागते. दरम्यान, विश्रांतीचा क्षण मिळताच सेटवरील स्पर्धक मजेदार रील व्हिडिओ बनवू लागतात. या रील व्हिडिओमध्ये स्पर्धक राजीव अडातिया आणि जन्नत जुबेर यांनी करण जोहरच्या सुपरहिट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मधील लोकप्रिय सीन रिक्रिएट केला आहे. यामध्ये ते काजोल आणि फरीदा जलाल यांच्यातील सीन रिपीट करताना दिसत आहे. व्हिडिओ खूपच मजेदार आहे. (jannat zubair rajiv adatia lipsink on k3g scene)
पहिल्या आठवड्यापासून या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या शोमध्ये सृती झा, रुबिना डिलेक, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अडातिया, तुषार कालिया, एरिका पॅकार्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी हे कलाकार आहेत. यावेळी शोमधली सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आणि सोशल मीडिया स्टार फैजू आणि जन्नत जुबेरची जोडी आहे. या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत आहे. हा शो २ जुलैपासून कलर्सवर रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे.