उर्फी जावेद (urfi javed) नेहमीच तिच्या फॅशन निवडीमुळे चर्चेत असते. ती तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, तिला तिच्या फॅशनबाबत ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे. पण ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देत ती तिच्या फॅशनच्या आवडीनिवडींवर प्रयोग करायला मागेपुढे पाहत नाही. उर्फीने पुन्हा एकदा तिच्या क्रिएटिव्ह फॅशन सेन्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. यावेळी उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती रेझर ब्लेडने बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये उर्फी रेझर ब्लेडने बनवलेल्या आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. उर्फीने हा पोशाख थाई स्लिटप्रमाणे डिझाइन केला आहे आणि त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत आणि तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर विखुरलेले आहेत.
व्हिडिओमध्ये उर्फी जावेद तिच्या जबरदस्त लूकमध्ये पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फीने लिहिले की, “मी इंट्रोव्हर्ट्ससाठी परफेक्ट ड्रेस तयार केला आहे. रेझर कट! हा ड्रेस रेझरपासून बनवला आहे! माझ्या विलक्षण कल्पनांसाठी मला मदत केल्याबद्दल मी माझ्या टीमचे पुरेसे आभार मानू शकत नाही.”
https://www.instagram.com/reel/Cf5vE0qFEeJ/?utm_source=ig_web_copy_link
उर्फी जावेदची सर्जनशीलता आणि पोशाख पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. उर्फीच्या पोस्टचा कमेंट सेक्शन तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक करणाऱ्या चाहत्यांनी भरलेला आहे. एका चाहत्याने लिहिले, “अरे देवा! अप्रतिम ड्रेस अमेझिंग उर्फी.” दुसर्या एका चाहत्याने लिहिले की, “ईदसाठी पैसे देऊ नका, गोड मिळणार नाही.” दुसर्याने लिहिले, “हाहाहाहा छान.” अशाप्रकारे तिचे चाहते कमेंट करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
प्रकाश मेहरा यांनीच अमिताभ बच्चन यांना बनवले ‘अँग्री यंग मॅन’, बदलली चित्रपटांची कहाणी
अगं बाबो ! ‘केजीएफ’च्या यशानंतर श्रीनिधीने वाढवली तब्बल ‘एवढे’ कोटी फी
बॉडी करायचीय मग वापरा ‘बिग बॉस’ फेम असीम रियाझचा ‘हा’ डाईट प्लॅन