Monday, July 1, 2024

‘तमाशा लाईव्ह’ची एवढी चर्चा होण्याचं कारण काय?

सध्या मराठी सिने जगतात अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नाविण्यपूर्ण कथा आणि मांडणी यांमुळे या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. असाच नवीन कथा आणि  मांडणी असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे तमाशा लाईव्ह. संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची इतकी चर्चा होण्यामागे कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत. 

मराठी सिने जगतात सध्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची जोरदार चर्चा  पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर आणि ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. डिग्रीचा एक कागद मिळाला म्हणजे कुणी पत्रकार होत नाही अशा धमाकेदार डायलॉगने या ट्रेलरची सुरूवात होते. राजकारण आणि सतत ब्रेकिंगसाठी धडपडणारी, टीआरपी म्हणजेच सर्वस्व मानणारी मीडिया आणि त्याला हव तस वापरणारे राजकारण यांची रंजक कथा या चित्रपटात दाखवली आहे.

त्याचबरोबर तमाशा लाईव्ह चित्रपट चर्चेत येण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची स्टार कास्ट. तमाशा लाईव्ह चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे असे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार अभिनय साकारणार आहेत त्यामुळेही या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. दमदार कलाकारांच्या यादीबरोबरच चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे.

आत्तापर्यंत चित्रपटातील फड लागलाय, मेल्याहून मेल्यागत,  रंग लागला, वाघ आला वाघ अशी एकापेक्षा एक धमाकेदार गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गाण्यातील सोनाली कुलकर्णीच्या अदा आणि डान्सपाहून नेटकरीही चांगलेच घायाळ झाले आहेत. त्यामुळेच चित्रपटाची गाणी, डायलॉग, कथा, आणि दिग्गज कलाकारांच्या भूमिका यांमुळेच हा चित्रपट चांगलाच गाजणार आहे. १५ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांनाही जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा –

सुशांत सिंग राजपूतला अं’मली पदार्थ द्यायची रिया चक्रवर्ती, आरोपपत्रात NCBचा हैराण करणारा दावा

‘जिवाची होतिया काहिली’ या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर पहिल्यांदाच राजकुमार रावने मांडले मत, ‘मला माहीत आहे…’

हे देखील वाचा