वॉल्ट डिज्नी कंपनीने सोमवारी (११ जुलै) घोषणा केली आहे की, ते दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध बीटीएस बँडवर डॉक्यूमेंट्री सिरीज आणि म्यूझीक शोज बनवतील, जी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाईल. पुढील वर्षी सुरू होणार्या या डॉक्यूमेंट्रीमध्ये दक्षिण कोरियाच्या गटातील नऊ वर्षांचे संगीत आणि फुटेज यांचा समावेश असेल. त्याचे नाव ‘BTS Monuments Beyond the Star’ असे असेल.
BTS बँडच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी
एका निवेदनाद्वारे डिज्नी कंपनीने घोषणा केली आहे की, “या डॉक्यूमेंट्रीमध्ये समूह सदस्यांचे दैनंदिन जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे नियोजन दाखवले जाईल, ज्याचा ते त्यांच्या कार्यक्रमात समावेश करतील.” (bts documentary series will be stream on disney plus)
काय आहे BTS बँड?
BTS बँड हा दक्षिण कोरियाचा एक अतिशय लोकप्रिय बँड आहे, ज्याला जगभरातील लाखो लोक पसंत करतात. गेल्या महिन्यात बँडने घोषणा केली होती की, ते ब्रेक घेणार आहेत. ७ सदस्यांचा हा बँड आता सोलो परफॉर्म करणार आहे. बीटीएसच्या या घोषणेनंतर प्रश्न निर्माण झाले आहेत की, या बँडचे सदस्य प्रसिद्धी मिळताच महत्त्वाकांक्षी झाले आहेत का?
तसेच, ही डॉक्यूमेंट्री जागतिक स्तरावर प्रदर्शित केली जाईल, असेही डिज्नीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. डिज्नी प्लस व्यतिरिक्त, हे हुलु वर देखील स्ट्रीम केले जाईल. BTS ची व्यवस्थापन कंपनी HYBE सोबत एक करार झाला आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये लॉस एंजेलिसमधील स्टेडियममध्ये आयोजित म्यूझिक कॉन्सर्टचे रेकॉर्डिंग प्ले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीच्या दोन वर्षानंतर आता चाहत्यांना पुन्हा एकदा BTS ग्रुपचा परफॉर्मेंस पाहण्याची संधी मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










