Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्डनेसने राडा करणाऱ्या ईशा गुप्ताने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ, तुम्हालाही मिळतील जबरदस्त टिप्स

बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री आपल्या शरीराची खास काळजी घेतात. यासाठी ते आवश्यक असलेले डायट फॉलो करतात. तसेच, सकाळी लवकर उठून व्यायामही करतात. या अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ता हिचादेखील समावेश आहे. ईशा तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. नेहमीच सोशल मीडियावर ईशाचे फिटनेस वर्कआऊट व्हिडिओ समोर येत असतात. अशातच तिचा नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर धमाल करत आहे. या व्हिडिओत ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ
बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिचे नावही यादीत टॉपला असते. ईशाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ईशा तिच्या ट्रेनरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. ईशा या व्हिडिओत हाताच्या पुढील भागाचा व्यायाम करताना दिसत आहे.

ज्या मेहनतीने ईशा वर्कआऊट करत आहे, त्यावरून तिचा फिटनेसचे गुपीत समोर येत आहे. अशाप्रकारे वर्कआऊटमधूनच ईशाच्या शानदार फिटनेसचा अंदाज लावला जाऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओ
ईशा गुप्ताचा हा ताजा वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हायरल झाला. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला १ लाखांहून अधिक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे, तर ५००हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. ईशाला इंस्टाग्रामवर ८९ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात.

ईशाचे सिनेमे
अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्या अभिनयाबाबत बोलायचं झालं, तर तिने २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जन्नत २’ या सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमात तिच्यासोबत ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याने काम केले होते. यानंतर तिने ‘बादशाहो’, ‘कमांडो २’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ यांसारख्या सुपरहिट सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘लव्हबर्ड्स’ करण अन् तेजस्वीचे नवीन गाणे रिलीझ, दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधले सर्वांचे लक्ष

टायगर श्रॉफला जोराची लागली, तरीही भावाने सोडला नाही डान्स; व्हिडिओत दिसला अभिनेत्याचा संघर्ष

अगं बाबो! तब्ब्ल 45 हजाराची साडी नेसून मौनी रॉयच्या अदा, चाहत्यांच्या कमेंट्सनी वेधले लक्ष

हे देखील वाचा