बॉलीवुड अभिनेता ‘रणबीर कपूर’ (Ranbir Kapoor)च्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात सध्या बरंच काही सुरू आहे. तो लवकरच बाबा होणार आहे. त्याचबरोबर त्याचे दोन सिनेमे ‘शमशेरा’ (Shamshera) आणि ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmāstra) लवकरच रिलीज होणार आहेत. अशात रणबीर त्याच्या या दोन्ही सिनेमांचं जोरदार प्रमोशन करत आहे. पण आज तुम्हाला रणबीरचा असा एक किस्सा सांगणार आहे, ज्यात रणबीरला एका हॉलीवुड अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं होतं. ही अभिनेत्री रणबीरला असं काहीतरी बोलली होती, ज्यामुळे त्याचं हार्टब्रेक झालं होतं.
खरंतर, रणबीर कपूर हॉलीवुड अभिनेत्री, ‘नैताली पोर्टमॅन’चा (Natalie Portman) चाहता आहे. ती त्याला खूप आवडते. यामुळेच जेव्हा रणबीरने, नैतालीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर पाहिलं तेव्हा तो तिच्या मागेमागे चालु लागला. या गोष्टीचा खुलासा रणबीरने, द कपिल शर्मा शोमध्ये केला होता .रणबीरने सांगितले होते की, न्यूयॉर्कमध्ये असताना जेव्हा तो त्याच्या हॉटेलकडे चालला होता, त्यावेळी नैताली पोर्टमॅन त्याच्या बाजुने गेलेली रणबीरने पाहीलं.
पुढे तो म्हणाला की “मी त्यांचा चाहता असाल्यामुळे त्यांच्या सोबत एक फोटो काढण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे मी त्यांच्या मागे मागे गेलो आणि प्लीज एक फोटो, एक फोटो, एक फोटो असं म्हणू लागलो. परंतु मी पाहिलं नव्हतं की, त्या कोणाबरोबर तरी फ़ोन वर बोलत आहेत आणि रडत ही आहेत. तेव्हा त्यांनी रागाने माझाकडे पहिलं आणि मला बोलल्या इथून निघुन जा. त्यानंतर मी तिथुन गेलो, पण माझं हार्टब्रेक झालं होतं,”
दरम्यान रणबीरचा सिनेमा शमशेरा २२ जुलै ला रिलीज होणार आहे, ज्यात रणबीरचा डबल रोल आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूर सोबत वाणी कपूर आणि संजय दत्त हे देखाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन करण मल्होत्राने (Karan Malhotra) केलं आहे.










