Wednesday, January 14, 2026
Home साऊथ सिनेमा ‘पुष्पा’ने २०२१ तर गाजवलंच, पण २०२२मध्येही धमाल सुरूच, ठरला एकमेव भारतीय सिनेमा

‘पुष्पा’ने २०२१ तर गाजवलंच, पण २०२२मध्येही धमाल सुरूच, ठरला एकमेव भारतीय सिनेमा

सन २०२१मध्ये रुपेरी पडदा गाजवणारा सिनेमा कोणता? असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडी एकच नाव येईल, ते म्हणजे, ‘पुष्पा- द राइज‘ होय. या सिनेमाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित या सिनेमाला प्रदर्शित होऊन महिने उलटले असले, तरीही याची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. अल्लू अर्जुनच्या डायलॉगपासून यातील गाणीही ब्लॉकबस्टर ठरली. या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक विक्रम प्रस्थापित केले होते आणि अजूनही करतच आहे. ‘पुष्पा: द राइज’ या सिनेमाने आणखी एक विक्रम रचला आहे.

पुष्पा सिनेमाचा विक्रम
सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा दिवसेंदिवस यशाच्या पायऱ्या चढत आहे. सिनेमाने नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. ‘पुष्पा’ (Pushpa) हा सिनेमा भारताचा पहिला असा पॅन इंडिया सिनेमा बनला आहे, ज्याच्या अल्बमला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या अल्बमला एकूण ५ बिलियन म्हणजेच ५०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. स्टारकास्टमुळेही हा सिनेमा चांगलाच गाजला.

या सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती देत लिहिले की, “भारतीय सिनेसृष्टीत हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. आयकॉन स्टार अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा: द राइज’ पहिला असा अल्बम आहे, जो ५ बिलियनप व्ह्यूजपर्यंत पोहोचला आहे.”

सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये क्रेझ
कोणत्याही सिनेमाच्या पोस्टरवरून त्या सिनेमाच्या कहाणीकडे प्रेक्षकांचे आकर्षण वाढत असते. असेच काहीसे अल्लू अर्जुनच्या या सिनेमाबाबतही झाले होते. सिनेमातील अल्लूचा पहिला लूक समोर येताच, या सिनेमाने विक्रमांचा पाऊस पाडला. आता या विक्रमासोबत ‘पुष्पा’ सिनेमा इतका मोठा बनला आहे की, हा सिनेमा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉक्स ऑफिसवर किती कमावले?
‘पुष्पा: द राइज’ या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. हिंदीमध्ये या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली होती, तर दुसरीकडे जगभरात या सिनेमाने ३०० कोटींहून अधिक रुपये कमावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

राखीला दमच नाही! ‘ड्रामा क्वीन’ने करून टाकली अंकिताच्या प्रेग्नंसीची पोलखोल, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मद्रास हाय कोर्टाचा विजयबाबत मोठा निर्णय, अमेरिकेतून मागवलेल्या बीएमडब्ल्यू कारशी आहे संबंध

शॉकिंग! सामान खरेदीसाठी निघालेल्या गायिकेसोबत रिक्षाचालकाकडून घृणास्पद कृत्य

हे देखील वाचा