Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड बापरे! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा थेट अभ्यासक्रमात समावेश, पण का?

बापरे! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा थेट अभ्यासक्रमात समावेश, पण का?

हिंंदी सिने जगतात असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन बराच काळ गेला तरी हे चित्रपट प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. असाच गाजलेला हिंदी चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’. अनेक दिग्गज कलाकारांची गर्दी असलेला हा चित्रपट तरुणाईचा आवडता चित्रपट म्हणून ओळखला जातो. चित्रपटात ऋतिक रोशन, कॅटरिना कैफ, अभय देओल, फरहान अख्तर, आणि कल्की कोचलिन या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाबद्दल आता नवीन माहिती समोर आली असून जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट आजही तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आयुष्य एकदाच मिळते आणि ते भरभरुन जगावं असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हेतर विदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटाची कथा तर अप्रतिम होतीच त्याचबरोबर चित्रपटातील दमदार गाण्यांनीही सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली असून जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाचा स्पेनमधील कॉलेजच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. हा एक मार्केटिंग कोर्स आहे, ज्यामध्ये हा हिंदी चित्रपट आता अभ्यासाला दिला जाणारा आहे.

स्पेनच्या अभ्यासक्रमात हा चित्रपट समाविष्ठ करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या चित्रपटाने स्पेनचं टुरिझम मोठ्या प्रमाणावर वाढवले होते. या चित्रपटानंतर स्पेनच्या टुरिझममध्ये तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली होती.याचे कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाचे शुटिंग स्पेनच्या अनेक भागात करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी वाढली होती. त्यानंतर आता हा आकडा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळेच या चित्रपटाचा थेट अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने प्रेक्षकांना सकारात्मक राहण्याचा संदेश दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

आय्यो..! एक नाही आलियाच्या पोटात दोन-दोन बाळ? रनालियाला होणार जुळं?

दिवसेंदिवस वाढत चाललाय मौनी रॉयचा बोल्डनेस, पतीसोबतचा खासगी फोटो शेअर करत केले नेटकऱ्यांना घायाळ

‘राजकारणावर हक्काने बोलणं प्रत्येक शेंबड्या पोराचा जन्मसिद्ध अधिकार’, दिग्दर्शक विजू मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा