Saturday, October 18, 2025
Home टेलिव्हिजन बाप रे! ‘बिग बॉस’च्या स्पर्धकसोबत झाला ऑनलाइन फ्रॉड, ‘इतकी’ रक्कम झाली खात्यातून गायब

बाप रे! ‘बिग बॉस’च्या स्पर्धकसोबत झाला ऑनलाइन फ्रॉड, ‘इतकी’ रक्कम झाली खात्यातून गायब

ऑनलाइन फसवणूकप्रकरणी आणखी एक प्रकरण समोर आले आहे. खरंतर, आता लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘नागिन ६’ची अभिनेत्री महेक चहल (Mahekk Chahal) देखील ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाली आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनच्या बहाण्याने महेकच्या अकाऊंटमधून हजारो रुपये काढण्यात आले. अलीकडेच अभिनेत्रीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

10 रुपयांत साइटवर केलं रजिस्ट्रेशन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेक चहलने पोलिसांत तक्रार दाखल करताना सांगितले की, तिला गुरुग्रामला पार्सल पाठवायचे होते. या कारणास्तव, १२ जुलै रोजी, महेकने इंटरनेटवर ऑनलाइन कुरिअर पाठविण्याचे पर्याय शोधले. महेकने सांगितले की, त्यानंतर तिला फोन आला. त्याने सांगितले की, तो मोठ्या कुरिअर कंपनीतून फोन आहे. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, कॉलरने ज्या साइटबद्दल बोलले होते, त्यावर तिने १० रुपयांची नोंदणी केली. तिला ऑनलाइन कुरियर पाठवण्यासाठी पैसे द्यावे लागले. त्यानंतर जेव्हा त्या व्यक्ती मेहकशी पैसे भरण्याबाबत बोलली, तेव्हा तिने गुगल पे केले, मात्र पेमेंट झाले नाही. (online fraud with bigg boss ex contestant mehekk chahal)

२० सेकंदात गायब झाले महेकचे पैसे
पेमेंट झाले नाही, तेव्हा त्या व्यक्तीने महेकला लिंक पाठवली आणि सांगितले की, तुम्हाला २० सेकंदात ओटीपी मिळेल मग पेमेंट होईल. मात्र, महेककडे लिंक येताच तिच्या खात्यातून ४९ हजार रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा महेकला समजले, तेव्हा तिने लगेचच आपली उर्वरित कार्ड आणि बँक खाती फ्रीज केली. महेकने असेही सांगितले की, सायबर शाखेने तिला त्वरित मदत केली. एफआयआरनंतर लगेचच तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा