बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली सुष्मिता सेन सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सुष्मिताला डेट करत असल्याचे सांगत खळबळ माजवली आहे. मात्र, नंतर त्यांनी याबाबत खुलासाही केला. ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे चांगलेच व्हायरल झाले. या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये या दोघांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
ललित मोदी (Lalit Modi) यांनी १९९१मध्ये मीनल मोदी (Minal Modi) यांच्यासोबत लग्न केले होते. मीनल मोदी या ललित मोदींपेक्षा वयाने १० वर्षांनी मोठ्या होत्या. मात्र, तरीही त्या दोघांमध्ये जीवापाड प्रेम होते. त्यांना रुचीर आणि आलिया ही दोन अपत्य आहेत. अलीकडेच आलियाचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो ललित यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सौंदर्याच्या बाबतीत आलियाने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.
View this post on Instagram
आलिया एक उद्योजिका आहे. ती इंटिरियर डिझाईन आणि डिझाईन कन्सल्टन्सी कंपनीची संस्थापक आहे. ललित मोदी यांचे त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप चांगले संबंध आहेत. त्यांची झलक त्यांचा मुलगा रुचीरमध्ये स्पष्टपणे दिसते. सोशल मीडियावर ललित मोदींच्या कुटुंबाचे फोटो तुम्हाला सहज पाहायला मिळतील.
या व्यतिरिक्त सुष्मिताबद्दल बोलायचे झाले, तर सुष्मिता सेन (Sushmita Sen) एका बंगाली कुटुंबामधून आली आहे. तिच्या वडिलांचे नाव शुबीर सेन आहे. ते माजी हवाई दल अधिकारी होते. तिच्या आईचा दुबईमध्ये ज्वेलरी डिझायनिंगचा उद्योग आहे. त्याचप्रमाने भाऊ अभिनय क्षेत्रात आहे. राजीव सतत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अलीकडेच राजीव आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. सुष्मिता ही सिंगल मदर आहे. तिनी रेनी आणि अलिशाला दत्तक घेतले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Masaba Masaba Season 2 | आई नीनासोबत धमाल करायला पुन्हा सज्ज झालीय मसाबा, ट्रेलर पाहुन वाढेल उत्कंठा
बापरे! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा थेट अभ्यासक्रमात समावेश, पण का?