Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारती सिंगचा लेक झाला हॅरी पॉटर, फोटो पाहून बॉलिवूड कलाकारही झाले फिदा

हिंदी सिने जगतात सध्या अनेक अभिनेत्री त्यांच्या मातृत्वाचा आनंद लुटताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री भारती सिंगची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भारती सिंगने काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला होता. तेव्हापासून भारती सिंग (Bharati Singh) तिच्या मुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसली होती. काही दिवसांपूर्वीच भारतीने तिच्या मुलाचे नावही सोशल मीडियावर जाहिर केले होते. आता पुन्हा एकदा भारती सिंगने तिच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, भारती सिंग ही लोकप्रिय कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या अनोख्या विनोदी शैलीमुळे आणि अभिनयामुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. सिने जगतात भारतीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीने मुलाला जन्म दिला होता. ज्याचे लक्ष्य असे नाव तिने सोशल मीडियावरुन जाहीर केले होते. भारती सोशल मीडियावरुन आपल्या मुलाचे फोटो नेहमीच शेअर करत असते. सध्या तिने असेच काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत ज्यामधील त्याचा क्यूट हॅरी पॉटर लूक पाहून फक्त नेटकरीच नव्हेतर सिने कलाकारही कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

अभिनेत्रीने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटकरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लहान मुलगा हॅरी पॉटरच्या लूकमध्ये दिसत आहे. डोक्यावर लाल टोपी, काळ्या रंगाचा चश्मा, आणि हातात छडी घेतलेला लक्ष खूपच गोंडस दिसत आहे. त्याच्या या गोंडस क्यूट लुकवर नेटकरी खूपच फिदा झाले आहे. त्याचबरोबर या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भारतीच्या मुलाच्या या गोंंडस लूकने फक्त नेटकरीच नव्हेतर सिने कलाकारही घायाळ झाले आहेत.

अनेक कलाकारांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री गौहर खानने हे फोटो पाहून प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर अभिनेता अली गोनीनेही या फोटोवर प्रतिक्रिया देताना “कुणाची नजर लागू नये” असे लिहले आहे. तर सारा खाननेही “किती गोंडस” अशी बोलकी प्रतिक्रिया या फोटोवर दिली आहे.

हे देखील वाचा