टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी १२’ सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकार दिसत आहेत. यावेळी शोमध्ये स्पर्धक धमाकेदार परफॉर्म करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही वाढत आहे. शोच्या सेटवर होस्ट रोहित शेट्टी (Rohit Shetty) स्पर्धकांसोबत प्रँक देखील करताना दिसत आहे. दरम्यान शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीझ झाला आहे, ज्यामध्ये रुबिना दिलैकला (Rubina Dilaik) एक विचित्र टास्क मिळाला आहे.
‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये अनेकदा स्पर्धक टास्कमुळे घाबरून पळून जातात. त्याचवेळी कोणीतरी त्यांना सहज पूर्ण करतं. हा शो बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत आहे. आता या शोचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रुबिना दिलैकला एक विचित्र टास्क देण्यात आला आहे. (rubina dilaik has to kiss lguana rohit shetty challenge)
रोहित शेट्टी रुबिनाला सांगतो की, त्याने रात्री स्वप्नात रुबिनाचा पती अभिनवला पाहिला. सेटवर तो वेश बदलून इकडे तिकडे फिरत आहे. आता रुबिनाला त्याला भेटवायचे आहे. हे ऐकून रुबिना घाबरली आणि ती म्हणते की, “सर, असं कोणालाही पप्पी द्यायला नका सांगू. रोहितने रुबिनाचा मुद्दा पकडला आणि तिला एका प्राण्याची किस घेण्याचे आव्हान दिले.
हा प्राणी दुसरा कोणी नसून सरड्यासारखा Lguana आहे. शोचा एक टीम मेंबर लागुआना हातात आणताच, रुबिना घाबरते आणि रडायला लागते. मग त्याला पकडून तिच्याकडे नेले जाते. प्रदीर्घ चर्चेनंतर रुबिना लगुआनाला किस करून पळून जाते. हे पाहून रोहित शेट्टी प्रचंड हसला. बाकीच्या स्पर्धकांनाही हसायला येतं.
खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:
https://www.instagram.com/p/CgGdwcEjoTY/?utm_source=ig_embed&ig_rid=fb3d0f83-1d1e-41ac-ad27-3041e6d96555
गेल्या दोन आठवड्यांत शोमध्ये अनेक धोकादायक स्टंट दाखवण्यात आले आहेत. कधीकधी स्पर्धकांना शो होस्ट रोहित शेट्टीचे आव्हानही स्वीकारावे लागते. दरम्यान, विश्रांतीचा क्षण मिळताच सेटवरील स्पर्धक मजेदार रील व्हिडिओ बनवू लागतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा