राज कूपर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट १९८५ साली रिलीझ झाला होता. या चित्रपटातून राज कपुर यांचा मुलगा राजीव कपूरने पुन्हा एकदा चित्रपटात नव्याने एंट्री केली होती. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. राजीव आणि मंदाकिनी व्यतिरिक्त या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, रझा मुराद, सईद जाफरी, सुषमा सेठ सारखे कलाकार होते. याशिवाय आणखी एका सुंदर अभिनेत्रीला राज कपूर यांनी या चित्रपटात संधी दिली होती. ती अभिनेत्री म्हणजे दिव्या राणा.
अभिनेत्री दिव्याचा पहिला चित्रपट ‘एक जान हैं हम’ हा होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने चित्रपट हिट झाला नाही. राजीव कपूर आणि दिव्या राणाची जोडीही प्रेक्षकांना पसंत पडली नव्हती. पण राजीव यांचे वडील राज कपूर यांनी त्या दोघांना घेऊन ‘राम तेरी गंगा मैली’ हा दुसरा चित्रपट बनवला. मात्र, या चित्रपटाचे सर्व श्रेय मंदाकिनीला गेले. ओल्याचिंब भिजलेल्या साडीतील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनली. प्रेक्षकांच्या नजरेत दिव्या राणा त्यांच्यासमोर कधीच येऊ शकली नाही.
मंदाकिनीने चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. तिचे बोल्ड आणि हॉट सीन अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले. पण ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील तिचा अतिशय हॉट सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट प्रचंड हिट झाला, पण दिव्याच्या करिअरवर याचा काहीच परिणाम झाला नाही. दिव्याने ‘वतन के रखवाले’, ‘एक ही मोक्ष’, ‘आसमान’ आणि ‘माँ कसम’ या चित्रपटांमध्ये काम केले.
पण या नंतरही दिव्याचे नाणे चित्रपट विक्ष्वात खणखणीत वाजलेच नाही. जे स्वप्न घेऊन दिव्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते ते कधीच पुर्ण झाले नाही. यानंतर दिव्या राणाने चित्रपटात काम करणे बंद केले. अभिनय सोडल्यानंतर दिव्याने मुंबईतील उद्योगपती फजलशी विवाह केला. लग्नानंतर तिने तिचे नाव बदलून सलमा मनेकिया ठेवले. दिव्या मुंबईतच फोटोग्राफर म्हणून काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…