Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी भल्या- भल्या डान्सरलाही लाजवेल ‘या’ चिमुकल्याचा जबरदस्त डान्स, पाहून तुम्हीही कराल कौतुक

भल्या- भल्या डान्सरलाही लाजवेल ‘या’ चिमुकल्याचा जबरदस्त डान्स, पाहून तुम्हीही कराल कौतुक

सध्या प्रदर्शित होणाऱ्या नवीन सिनेमांवर आणि व्हायरल गाण्यांवर रील बनवण्याचा जणू ट्रेंडच सुरू झाला आहे. आधी ‘पुष्पा’ सिनेमाच्या गाण्यांवर आणि डायलॉग्जवर रील्स बनले. त्यानंतर ‘कच्चा बदाम’ गाण्यावर लाखो रील बनले आहेत. सामान्य लोकांपासून ते मोठ-मोठ्या कलाकारांपर्यंत अनेकजण या गाण्यावर रील व्हिडिओ बनवत आहेत. या गाण्यामध्येच आता एक भोजपुरी गाणेही इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यावर एक छोटा मुलगा डान्स करत आहे.

खरं तर आपण ज्या छोट्या मुलाबद्दल बोलत आहोत, तो अनुज यादव आहे. त्याने आतापर्यंत फक्त बॉलिवूड गाण्यांवरच नाही, तर भोजपुरी गाण्यांवरही परफॉर्मन्स करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चिमुकल्याचा मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला होता, ज्यामध्ये तो भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या ‘कुकर भुअरा’ वर डान्स करताना दिसला होता. अशातच त्याचा एक दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो खेसारी आणि अभिनेत्री अक्षरा सिंगवर चित्रीत केलेल्या ‘ड्रीम में एन्ट्री’ या गाण्यावर जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे.

भोजपुरी सिनेसृष्टीतील या सुपरस्टार सिंगरच्या गाण्यावर अनुज यादव अप्रतिम एक्सप्रेशन देताना दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. ठुमके लावत अनुज ज्या पद्धतीने नाचत आहे, ते निश्चितच कौतुक करण्यासारखं आहे. अनुज भोजपुरी सिनेमाच्या प्रत्येक नवीन गाण्यावर त्याचे रील बनवतो आणि वयाच्या मानाने तो अप्रतिम हावभाव दाखवतो.

व्हिडिओमध्ये हा चिमुकला स्वॅग स्टाईलमध्ये असून गाण्यावर अप्रतिम लिपिसिंक करत आहे. आपण त्याच्या मूळ गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर हे गाणे दोन दिवसांपूर्वी ‘सारेगामा हम भोजपुरी’ या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला आतापर्यंत ६१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात रोमान्स ठासून भरला आहे. व्हिडिओमध्ये अक्षराने तिचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे, तिथे खेसारीने त्याच्या रॉकिंग लूकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

यापूर्वी खेसारी ‘तू झूटी तेरा प्यार झूटा’ या व्हिडिओ गाण्यात दिसला होता. हे गाणे खेसारी आणि खुशबू तिवारीने गायले होते. या व्हिडिओत खेसारीसोबत काजल राघवानी दिसली होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा