टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिने अभिनयाने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यापासून जॅस्मिनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इतकेच नव्हे, तर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे चाहत्यांचे खूप बारीक लक्ष आहे. त्याचबरोबर तिचे फोटो आणि व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेच जॅस्मिनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहतीसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, ती शांतपणे सेल्फी घेत असते. पण त्यानंतर असे काहीतरी घडले की अभिनेत्री स्तब्ध झाली.
चाहतीने केलं किस
टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीनच्या सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होत असतात. तिने तिच्या अनोख्या अंदाजात चाहत्यांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. चाहते तिला पाहताच तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपड करू लागतात. परंतु काही चाहते असते असतात जे आपल्या आवडत्या सेलब्रिटीसाठी वेडे असतात. असाच एक किस्सा जॅस्मिन सोबतही घडला आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एका चाहतीने अचानक जॅस्मिन भसीनला किस केले आहे. ज्यावर जॅस्मिनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. जॅस्मिन भसीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
स्तब्ध झाली जॅस्मिन
जॅस्मिन भसीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, जॅस्मिन भसीन रुग्णालयाच्या बाहेर पॅपराजींकडून स्पॉट होते. जिथे तिची एक चाहती सेल्फी घेण्यासाठी तिच्याकडे येते आणि अचानक जॅस्मिनला किस करते. हा सर्व प्रकार घडताच जॅस्मिन स्तब्ध झाली होती. जस्मिनचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अनेक मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.
जॅस्मिनचा अभिनयाच्या प्रवास
जॅस्मिन भसीन तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. ती मागील काही दिवसांपासून अभिनेता अली गोनीला डेट करत आहे. दोघांचे सुत बिग बॉसच्या घरातच जुळले आहे. जॅस्मिनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘दिल से दिल तक’, ‘बेलन वाली बहू’, ‘नागिन’ आणि ‘तू आशिकी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सर्वात गाजलेली तिची मालिका ‘टशन-ए-इश्क’ ही होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’