Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर बनणार चित्रपट; तर दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकरांच्या हाती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर बनणार चित्रपट; तर दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकरांच्या हाती

देशातील थोर व्यक्तींवर नेहमी चित्रपट येत असतात. हे चित्रपट प्रेक्षकांना त्या व्यक्तीच्या जीवनातील कार्याचे दर्शन घडवून देतात. अशा चित्रपटांना प्रेक्षकवर्ग देखील आवर्जून पाहतात. नुकतेच जाहीर करण्यात आले आहे की, स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदू महासभेचे महत्त्वाचे सदस्य वीर सावरकर यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी सांगणारा, एक वैशिष्ट्यीकृत चित्रपट बनविण्यात येणार आहे. ही घोषणा त्यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचे नाव ‘स्वातंत्रवीर सावरकर’ असणार आहे.

उल्लेखनीय आहे की, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर त्याची निर्मिती संदीप सिंग आणि अमित बी. माधवानी एकत्र मिळून करणार आहेत. या चित्रपटात महेश मांजरेकर दिग्दर्शकाव्यतिरिक्त, विरमणी यांच्यासमवेत लेखक म्हणून देखील भूमिका साकारणार आहेत.

वीर सावरकरांवर चित्रपट बनवण्याबद्दल खूप उत्साहित असलेले महेश मांजरेकर म्हणाले, “मी नेहमीपासूनच वीर सावरकरांच्या जीवनाने प्रभावित आहे. माझ्या मते, ते असे मनुष्य होते ज्यांना इतिहासात ते स्थान मिळालं नाही, ज्याचे ते हक्कदार होते. एक दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट बनवणे खूप मोठे आव्हान असेल, जे मी स्वीकारले आहे.”

याबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते संदीप सिंगने म्हटले की, “देशात अशा लोकांची कमी नाहीये, जे विनायक दामोदर सावरकरांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजही त्यांची आठवण काढतात आणि आदर करतात. मात्र, असेही काही लोक आहेत, जे देशातील स्वातंत्र्यात त्यांच्या योगदानासाठी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी त्यांची टीका करतात.”

या चित्रपटाची घोषणा करताना संदीप सिंग म्हणाले की, “वीर सावरकरांची कहाणी अशी आहे, ज्याला जाणून घेण्याची खूप गरज आहे. चित्रपटाची कथा भावनिक पद्धतीने पडद्यावर ठेवली जाईल.”

विशेष म्हणजे लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे. निर्मात्यांचा असा दावा आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांची लढाईची कथा पडद्यावर दाखवल्यावर, प्रेक्षकांचा इतिहास पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा