सध्या सातत्याने अभिनेत्रींच्या विनयभंगाच्या बातम्या येत आहे. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री याला बळी ठरत आहे.आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. एका अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या अभिनेत्रीने एका फायनान्सर विरोधात मुंबईमधील जुहू परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली आहे.
सदर आरोपीने एका व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या निमित्ताने तिच्यासोबत छेडछाड केली. जेव्हा अभिनेत्रीने त्याला विरोध केला तेव्हा त्या आरोपीने तिच्यासोबत चुकीची वर्तवणुक करत तिला शिव्या देखील दिल्या. आरोपी इथेच थांबला नाही तर त्याने अभिनेत्रीला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. आता या अभिनेत्रीच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी असणाऱ्या सुनील लोढा विरोधात IPC कलम 354, 506, 509 च्या अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. सोबतच त्यांनी पुढील तपस देखील सुरु केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन










