बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने मागील काही दशकांपासून रुपेरी पडद्यावर छाप सोडली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अभिनयाने नेहमी लोकांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नव्हे, तर बिग बींच्या पोस्ट देखील अनेकदा लोकांचे मनोरंजन करत असतात. बिग बी आपल्या चाहत्यांचे विशेष फोटो आणि व्हिडिओमधून मनोरंजन करताना दिसून येतात. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी अशीच एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट पाहून मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांनाही हसू आवरता आले नाही.
अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या सुपरहिट आणि सुप्रसिद्ध चित्रपटाची आठवण करून देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. तो सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘डॉन’ हा होय. या चित्रपटाच्या स्टोरीबरोबरच चित्रपटाची गाणीही खूप हिट झाली होती. या चित्रपटाच्या सुपरहिट गाण्यातील ‘खैके पान बनारस वाला’ या गाण्याला आजही लोक खूप मान देतात. हेच गाणं आता बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. मात्र, त्याला इंग्रजी गाण्याचा तडका देण्यात आला आहे. (A glimpse of a song from Big Bi’s ‘Don’ came in front of everyone)
बिग बींनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘खैके पान बनारस वाला’ या गाण्यावरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत खास कॅप्शन देखील लिहिले आहे. बिग बींनी कॅप्शन लिहिले की, “केले होते काय, झाले काय!!” तसेच त्यांनी देवनागरी लिपीसाठी चॅलेंज दिले आहे. बिग बींची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बिग बींच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. काही चाहत्यांनी तर इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि लेखिका श्वेता बच्चन नंदाने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्वेता बच्चनने कमेंट केली की, ‘हाहाहाहाहाहाहा ओह पा!’ इतकेच नव्हे तर बिग बींची नात नव्या नवेली नंदाने ही कमेंट करत लिहिले की, ‘हाहाहाहाहाहा.’
याव्यतिरिक्त स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आपल्या एका गाण्यामुळेही सध्या चर्चेत आहेत. स्वातंत्र्यदिनापूर्वी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, कैलाश खेर, सोनू निगम यांच्यासह १५ सेलिब्रिटींच्या आवाजात एक गाणे प्रसिद्ध होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एका लग्नात राजेश्वरीला एक देखणा मुलगा पसंत पडला, पण झालं असं की…
-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’