Saturday, June 29, 2024

पोन्नियिन सेलवन २ सिनेमातील ‘या’ गाण्याला घेऊन वाद, ए आर रहमान यांच्यावर गाणे चोरल्याचा मोठा आरोप

मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित असा ‘पोन्नियिन सेलवन 2’ सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने चांगली कामगिरी करत बक्कळ कमाई केली आहे. ऐश्वर्या राय आणि विक्रम यांच्या या सिनेमाने १०० कोटींची कमाई अगदी सहज केली. या सिनेमासोबतच सिनेमाच्या गाण्याची देखील जोरदार चर्चा आहे. मात्र आता यातच या सिनेमाच्या एका गाण्यावर चोरी केल्याचा आरोप केला जात आहे.

एका मोठ्या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार ध्रुपद सिंगर उस्ताद वसीफुद्दीन डागरने आरोप केला आहे की, ‘पोन्नियिन सेलवन 2’ सिनेमातील ए आर रहमान यांचे गाणे असलेल्या ‘वीरा राजा वीरा’ या गाण्याची धून त्याच्या वडिलांच्या आणि काकांच्या शिव स्तुतीमधून घेण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र रिपोर्टनुसार निर्मात्यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आणि त्या प्रोडक्शन हाऊस आणि मद्रास टॉकीजच्या सर्व आरोपांना चुकीचे सांगितले आहे. ‘वीरा राजा वीरा’ हे गाणे डागर ब्रदर्सच्या गाण्याची कॉपी नाहीये.

एका माहितीनुसार वसीफुद्दीन हे पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहे. मद्रास टॉकीजने दावा केला आहे की, ‘वीरा राजा वीरा’ ही एक पारंपरिक धून आहे. जिला नारायण पंडिताचार्य यांनी १३ व्या शताब्दी मध्ये बनवले होते. वसीफुद्दीनने रहमान यांना एक पत्र पाठवले आहे, ज्यात दावा केला आहे की, मद्रास टॉकीज आणि मवेरिक म्यूजिशियन यांची परवानगी त्यांनी घ्यायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तसे केले नाही. लिखाणाला तसेच तांडव शैलीमध्ये उचलले गेले आणि गायले गेले आहे. फक्त शब्दांना फिरवले आहे.

यावर अजून ए आर रहमान यांनी काहीच वक्तव्य केले नाही. दरम्यान ‘पोन्नियिन सेलवन 2’ सिनेमात विक्रम, ऐश्वर्या राय, कार्थी, जयम रवि, तृषा, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज आदी कलाकार असून हा सिनेमा लेखक कल्कि कृष्णमूर्ति यांच्या 1955 मध्ये आलेल्या एका तामिळ उपन्यासवर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

परिणीती आणि राघव चड्ढा यांनी घेतला आयपीएल सामन्याचा आनंद; स्टेडियममध्ये घुमला ‘परिणीती भाभी’चा नाद, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा