Saturday, July 6, 2024

ए आर रहमानने हिंदी बोलण्यावर केली होती एँकरची चेष्टा, स्पष्टीकरण देत म्हणाला ‘मी मस्करी करत होतो…’

ऑस्कर विजेता ए आर रहमान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. खरं तर एका इव्हेंटमध्ये ए आर रहमानने हिंदीमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या एका सूत्रसंचालकाची चेष्टा केल्यामुळे त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याबाबतीत ए आर रहमानने स्पष्टीकरण दिले आहे.

ही त्यावेळची गोष्ट आहे, ज्या वेळी संगीतकार ए आर रहमान याने एका इव्हेंटमध्ये सूत्रसंचालकाने हिंदीमध्ये सूत्रसंचालन केल्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती. ए आर रहमान याचा चित्रपट ’99 सॉंग’ प्रमोशन इव्हेंट सुरू होता. त्यावेळी तो हिंदी बोलण्याला विरोध करत आहे, असा त्याच्यावर आरोप लावला गेला होता. त्यावेळी त्याने असे सांगितले की, “मी त्यावेळेस मस्करी करत होतो. गोष्टी जास्त मनावर घेऊ नका.”

या इव्हेंटला चित्रपटाचा मुख्य अभिनेता ऐहान भट्ट आणि ए आर रहमान हे दोघे उपस्थित होते. ए आर रहमान याचे स्वागत तमिळ भाषेत केले. पण अभिनेता ऐहान भट्ट याचे स्वागत हिंदी भाषेत केले होते. रहमान त्यावेळी प्रश्नार्थक हेतूने बोलला की ‘हिंदी?’ स्टेजवरून खाली उतरल्यावर रहमानने सांगितले की, ‘मी तुला आधीच सगळे तमिळ भाषेमध्ये बोलायला सांगितले होते ना.’ त्यावेळी अँकर म्हणाला की, ‘हो तुम्ही मला तमिळ भाषेमध्ये बोलायला सांगितलं होते पण ऐहानला खुश करण्यासाठी मी हिंदी भाषेमध्ये बोललो.” यावर रहमानने हसून उत्तर दिले की, “अरे ठीक आहे मी फक्त मस्करी करत होतो.”

ए आर रहमानने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही तीन भाषांमध्ये म्युझिक लाँच करत होतो. आधी ते आम्ही हिंदी भाषेमध्ये लाँच केले, आणि नंतर तमिळ भाषेमध्ये लाँच केले होते. जिथे स्टेजचे काही कायदे होते. त्यामुळे आम्ही त्यांना आधीच तमिळ भाषेमध्ये बोलायला सांगितले होते. आधीच सगळे प्रेक्षक रंगावरून बोलत होते की, तो खूपच गोरा आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगितले होते फक्त तमिळमध्ये बोला.”

त्यानंतर रहमान याने सांगितले की, “मला असे वाटते की, तो ऐहानला खुश करण्यासाठी हिंदी भाषेत बोलला असेल, कारण त्याला हिंदी खूप चांगल्या प्रकारे समजते. मी केवळ हिंदी?? हा शब्द उच्चारला. नंतर येणाऱ्या अनेक लोकांनी त्यावर प्रश्न उभे केले की, मी हिंदीला विरोध करत आहे. पण ती केवळ एक मस्करी होती. मी अजिबात सीरियसली बोलत नव्हतो. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. पण मला असं वाटतं की, यामुळे आमचा खूप पैसा वाचला. आम्ही काहीही न करता माझा आणि ऐहानचा चेहरा संपूर्ण जगासमोर आला.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’चा माजी कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लाने साधला पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा, म्हणाला ‘वा रे वा…’

-‘इंदिरा नगर की गुंडी हूं मैं’, म्हणत दीपिका पदुकोणने शेअर केला लहानपणीचा क्यूट फोटो, छोट्या दीपिकालाही मिळतेय चाहत्यांची पसंती

-‘माझ्याकडे ब्राची जोडी आहे, पत्ता सांगा…’, अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर युजरची विचित्र कमेंट, तिनेही ‘अशी’ केली बोलती बंद

हे देखील वाचा