Thursday, March 28, 2024

चाहत्यांनो तयार राहा! ‘स्कॅम १९९२’नंतर आता येतेय ‘स्कॅम २००३’, पाहा कशावर आधारीत आहे ही सिरीज

हंसल मेहता म्हटले की जबरदस्त चित्रपट आणि क्राईमच्या बाप सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात शंकाच नाही. अनेक सुंदर चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या दिग्दर्शकाने काही महिन्यांपुर्वी आलेल्या स्कॅम १९९२ वेबसिरीजमधून आपले नाणे ओटीटीच्या विश्वातही खणखणीत वाजवून दाखवले. या सिरीजला भुतो ना भविष्यते असे यश मिळाले. याचमुळे या सिरीजच्या निर्मात्यांनी याच धाटणीची आणखी एक वेबसिरीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारलेली सिरीज ही हर्षल मेहताने केलेल्या शेअर बाजारातील स्कॅमवर आधारीत होती. तर नव्याने येत असलेली स्कॅम २००३ ही सिरीज अब्दुल करिम तेलगीने केलेल्या स्टॅंप पेपर घोटाळ्यावर आधारीत आहे. ही सिरीज पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर आधारित असणार आहे. या सिरीजचे नाव ‘स्कॅम २००३- क्युरियस केस ऑफ अब्दुल करिम तेलगी’ असे आहे.

१९६१मध्ये कर्नाटकमधील खानापूर येथे जन्म झालेल्या तेलगीचे बालपणीचे दिवस खूपच हालाखीत गेले. त्याचे वडिल भारतीय रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. बेळगावजवळचं तेलगीने खानापुरमध्ये फ्रुट स्टॉलवर सुरुवातीला काम सुरु केले होते. पुढे पैसे कमविण्याच्या हिशोबाने तो सौैदी अरेबियाला नोकरीला गेला, परंतू नोकरी गेल्यानंतर तो मुंबई शहरात आला व मुंबईत आल्यावर त्याने एरेबियन मेट्रो ट्रॅव्हेल नावाची कंपनी सुरु केली परंतू तो यात एका घोटाळ्यात अडकल्याने त्याला पोलीसांनी अटक केली.

रतन सोनी नावाच्या व्यक्तीला जेलमध्ये भेटल्यावर त्यांनी स्टॅंप पेपरचा स्कॅम करण्याची योजना आखली. अनेक निवृत्त सरकारी कर्मचार्यांना तेलगीने आपल्या जाळ्यात फसवत स्कॅमचा भाग केला असल्याची वृत्त त्यावेळी आली होती. १९९५ साली त्याला मुंबई पोलीसांनी दुसऱ्यांदा ताब्यात घेतले परंतू त्याला लगेच बेल मिळाली. त्याने एकदा बार डान्सला ९३ लाख रुपये दिल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पुढे २००५मध्ये त्या बार डान्सरच्या घरावर पोलीसांची रेड पडली होती.

तेलगीने जवळपास २० हजार कोटींचा घोटाळा केला होता. त्याला पोलीसांनी २००१्मध्ये अटक केली.त्याला अजमेर, राजस्थान येथे अटक केली. तसेच ३० वर्षांची जेल ठोठावली. तसेच २०२ कोटी रुपयांची फाईनसुद्धा त्याला झाली. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी त्याची बेंगलोरमधील एका जेलमध्ये निधन झाले. त्यापुर्वी त्याला एचआयव्हीची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एका सुपरस्टारची बायको आणि एका नेत्याचे नाव देखील समोर आले होते.

सिरीजबद्दल थोडक्यात- 

हंसल मेहता दिग्दर्शित या सिरीजचे लेखन मराठीतील दिग्गज लेखक ‘यज्ञोपवित’ करणार आहे. तसेच संजय सिंग देखील या लिखाणाच्या टीमचा एक भाग असतील. या सिरीजमध्ये मुख्य पात्र कोण निभावणार, याबदद्ल कोणतीही माहिती समोर आली नाही.  महाराष्ट्र पोलीसांनी केलेल्या चौकशीवर आधारीतच या सिरीजचा विषय असणार आहे.

या नवीन सीरिजचं नाव “स्कॅम :2003 द क्युरिअस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी” हे असणार आहे. अब्दुल करीम यांनी देशातील फर्जी स्टॅम्प पेपर बनवण्याचे पूर्ण नेटवर्क बनवले होते आणि पैसे छापण्याची एक मशीन जुगाडमध्ये खरेदी करून महाराष्ट्रात एक कारखाना बनवला होता. यावर्षाच्या शेवटी या सिरीजची शुटिंग सुरु होणार आहे.

हे देखील वाचा