Saturday, June 29, 2024

यामी गौतमच्या सस्पेन्स ड्रामा ‘अ थर्सडे’चा टीझर आला समोर, अभिनेत्री दिसली वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम च्या सस्पेन्स थ्रिलर ड्रामा ‘अ थर्सडे’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अशा स्थितीत यामीच्या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (१० फेब्रुवारी) प्रदर्शित होणार आहे.

एका खोलीत जेवणापासून ते केकपर्यंत सर्व काही दिसत आहे. खोलीत सर्व काही विखुरलेले आहे, असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. हे नर्सरीच्या वर्गासारखे  दिसत आहे. नर्सरीच्या वर्गातल्या मुलांना कोणीतरी ‘ट्विंकल-ट्विंकल’ कविता शिकवत असताना बॅकग्राऊंडला काही मुलांचा आवाज येतो. हा आवाज कुणाचा नसून यामी गौतमचा (Yami Gautam) आहे. त्यानंतर कॅमेरा यामी गौतमवर पडतो.

निळ्या रंगाचा डेनिम आणि शॉर्ट कुर्ता परिधान केलेली यामी समोरून बाजूला फिरताना दिसत आहे. मग बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो आणि सर्व काही शांत होते. त्यावेळी यामी गौतम अतिशय विचित्र लूक देते. टीझरमध्‍ये तिचा अ‍ॅटिट्यूड खूपच हटके वाटत आहे. हा टीझर पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये सस्पेन्स निर्माण झाला आहे. यामीच्या चेहऱ्यावरचा तणावपूर्ण देखावा आणि बालवाडीची प्रसन्न पार्श्वभूमी हे थ्रिलरसाठी योग्य सेटिंग आहे. डिझनी प्लस हॉटस्‍टार त्‍याच्‍या आगामी होस्टस् ड्रामा ‘अ थर्सडे’ सह ॲड्रेनालाईनच्‍या या थरारक डोससह प्रेक्षकांना रोमांचित करण्‍यासाठी सज्ज आहे. आरएसव्हीपी फिल्म्स निर्मित आणि बेहजाद खंबाटा दिग्दर्शित, यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला सस्पेन्स ड्रामा आहे. ट्विस्ट आणि टर्नने भरलेला, ‘ए थर्सडे’ प्रेक्षकांना रोमांचकारी राइडवर घेऊन जाईल!

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उद्यापर्यंत म्हणजेच ‘गुरुवार’ची वाट पाहावी लागणार आहे. हा टीझर शेअर करताना यामी गौतमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या दिवशी निरागसतेचा चेहरा बदलला. ट्रेलर उद्या येईल.”

यामी गौतमच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यामीने ४ जून रोजी चित्रपट निर्माता आदित्य धरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. नंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचा खुलासा केला.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा