Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड वादळ असो वा इतर काही, ‘या’ अभिनेत्रीला कसलाही फरक पडत नाही; पाहा स्विमसूटमधील घायाळ करणारे फोटो

वादळ असो वा इतर काही, ‘या’ अभिनेत्रीला कसलाही फरक पडत नाही; पाहा स्विमसूटमधील घायाळ करणारे फोटो

सोमवारी (१७ मे) तौक्ते चक्रीवादळाने देशभरात कहर केला आहे. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा परिणामही दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी मुंबईतील परिस्थितीची व्हिडिओ आणि फोटो शेअर करत माहिती दिली आहे. पण अहाना कुमराने या आपत्तीला संधी बनवून वादळात मजा केली आहे. याची एक झलक तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसमवेत शेअर केली आहे. ज्यामध्ये ती चक्रीवादळाच्या दरम्यान मस्ती करताना दिसत आहे.

अहाना कुमराने पांढर्‍या स्विमसूटमधील घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत. ती पूलमध्ये आनंद लूटताना दिसत आहे. अहाना कुमरा ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारख्या चित्रपटात झळकळी आहे. चाहत्यांना तिच्या दोन्ही चित्रपटातील भूमिका आवडल्या आहेत.

कधी ती पूलमध्ये उडी मारताना दिसली, तर कधी ती पूलच्या बाहेर बसून पोज देताना दिसली आहे. अहाना कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असते. ती आपल्या कामाची माहिती सतत  चाहत्यांसोबत शेअर करत असते.

फोटो शेअर करताना अभिनेत्रीने मुंबईतील हवामानाबद्दलही आनंद व्यक्त केला. तौक्ते चक्रीवादळाने सगळीकडे हाहाकार केला असला, तरीही अहानाला त्याचा कसलाही फरक पडत नाही. तिने त्यातूनही आपला आनंद शोधला आहे.

फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “थोडासा वेडेपणा, थोडा समजूतदार. वादळ आणि पावसाचे परिपूर्ण मिश्रण.” अहाना काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानच्या ‘बेताल’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ज्याची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली होती.

फोटोमध्ये अहाना कुमरा पूलच्या बाजूला बसून जबरदस्त पोझेस देताना दिसत आहे. ती कायमच तिचे आकर्षक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अनेक युजर्सने कमेंट करताना अहानाच्या अंदाजाचे कौतुक केले आहे. तिच्या सगळ्या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर कंमेंट्स केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

हे देखील वाचा