Friday, July 5, 2024

‘आई कुठे काय करते’ मालिकेत लग्न सोहळा चाललाय दणक्यात, संगीताचे फोटो आले समोर

टेलिव्हिजन दुनियेत सध्या अनेक मालिकांमध्ये लग्नाचे ट्रॅक सुरू आहेत. बऱ्याच मालिकांमध्ये लग्न सोहळा दाखवला आहे. अशातच स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत देखील सध्या लग्नाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिषेक आणि अनघाचा लग्न सोहळा पाहायला मिळत आहे.

लग्नाच्या आधीचे सगळे प्रोग्राम मालिकेत दाखवत आहे. मालिकेत अनघा आणि अभिषेक यांची हळद, मेहेंदी, संगीत असे सगळे प्रोग्राम पाहायला मिळणार आहे. अशातच मालिकेतील संगीत सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत. अनघा आणि अभिषेकच्या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबातील सगळेजण डान्स करताना दिसणार आहेत. घरातील सगळ्या सदस्यांची वेगळी वेशभूषा दिसत आहे. सगळेजण त्यांच्या वेगळया स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. (Aai kuthe kay karate serials Sangeet program photos viral on social media)

तसेच मालिकेत अरुंधती आणि तिचा मित्र डान्स करत असतो हे पाहून मात्र अनिरुद्ध खूप रागवतो. अरुंधतीने इतर कोणत्या पुरुषासोबत डान्स केलेला त्याला आवडत नसते.

‘आई कुठे काय करते’ ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेची कहाणी आणि पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. प्रत्येक पात्र लेखकाने उत्तम रीतीने रेखाटले आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेचा हिंदीमध्ये ‘अनुपमा’ नावाची रिमेक मालिका आहे.

हेही वाचा :

अनुष्कासोबत मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या वामिकाने केले विराटला चियर, फोटो झाला व्हायरल

‘राजा राणीची गं जोडी’मधील संजूचे सौंदर्य पाहून हरपेल तुमचेही भान, एकदा नजर टाकाच’

सोनाली खरेचा मुलीसोबत भन्नाट व्हिडिओ समोर, पाहून ओळखणेही होईल कठीण मुलगी कोण आणि आई कोण?

 

हे देखील वाचा