Saturday, July 6, 2024

मोजक्या शब्दांमधून अशोक सराफ यांनी मिलिंद गवळी यांना दिली आयुष्यातली ‘ही’ सर्वात मोठी शिकवण

आपल्याला अनेकदा असे वाटते की कलाकाराला मुख्य भूमिकेतच काम केल्यावर ओळख मिळते किंवा त्याचे कौतुक होते. मात्र खरंच हे बरोबर आहे का? जर कलाकार ताकदीचा आणि प्रतिभावान असेल तर तो जी लहान मोठी कोणतीही भूमिका करेल त्यात छापच पाडेल. आता अभिनेते मिलिंद गवळी यांचेच घ्या. सध्या ते स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते? या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. मात्र असे असूनही त्यांच्या लोकप्रियता कमी न होता अधिकच वाढत आहे. आज मिलिंद गवळी यांनी त्यांची भूमिका इतक्या ताकदीने साकारली आहे की, त्यांचे नाव उच्चहर्ले तरी तोंडातून ‘अनिरुद्ध’ हाच शब्द बाहेर येतो. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच मिलिंद हे उत्तम व्यक्त देखील होतात. अर्थात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांना आलेले विविध अनुभव, विविध शिकवणी, आठवणी सतत नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील ते त्यांच्या एका पोस्टसाठीच गाजत आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांना जीवनात दोन महत्वाच्या शिकवणी दोन मोठ्या व्यक्तींकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना एक शिकवण दिग्गज आणि जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी देखील दिली आहे. या दोन शिकवणींबद्दल त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये स्पष्ट लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “Acceptance (स्वीकारणे)
लहानपणापासून आपण आपल्याबद्दल एक धारणा तयार करतो, अमुक अमुक गोष्टी आपल्याला आवडतात, अमुक आवडतच नाही, लहानपणीच आपलं ठरलेलं असतं की या या भाज्या आपल्याला आवडतात या आवडत नाही, काहींना गोड आवडतं काहींना तिखट आवडतं, असंच आवडतं आपण असेच आहोत, माझे लहानपणी खाण्यापिण्याचे खूप नखरे होते, आणि आई होतीच माझे लाड पुरवायला, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा, दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं, पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं, माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो, मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो , एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा. त्या दिवसापासून आजपर्यंत खाण्यापिण्याचे माझे सगळे लाड नखरे संपले, ताटात जे येईल ते निमुटपणे खायचं नखरे करायचे नाहीत.”

पुढे मिलिंद यांनी लिहिले, “पण कपड्यांच्या बाबतीत माझे नखरे चालूच होते, मला हे शोभतं , मला ते शोभत नाही , मी हे घालणार मी हे घालणार नाही , असं बरीच वर्ष चाललं होतं, हा रंग मला आवडतो हा रंग मला आवडत नाही, अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत, ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर hit सिनेमेकेले आहेत “ आणि त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो.”

पुढे त्यांनी लिहिले, “पण वैयक्तिक जीवनात मला माझ्याच choice चे कपडे घालायला आवडायचे,
पण “ आई कुठे काय करते “ दरम्यान बरेचसे events केले. अनेक designers ने माझ्यासाठी costumes create केले . जे माझ्या comfort zone च्या पलीकडचे होते, भोसला मिलिटरीतले मेजर राठोड सारखेच माझे डिझायनर आहेत, डिझायनर भाग्यश्री ,दर्शना शानबाग , प्रणिता तन्मय… अधिकाऱ्याने आणि हक्काने मला experiments करायला सांगतात…काही नवीन प्रयोग करायला त्यासाठी स्वीकृती असणं महत्त्वाचं असतं.’ नंतर मीदेखील आयुष्यातील हा टप्पा एन्जॉय करत आहे. कधीही न वापरलेले वेगवेगळे रंग मी परिधान केले. त्यामुळे माझ्या आयुष्यातही नवे रंग आले. माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आणल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद!”

मिलिंद गवळी यांना ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमुळे अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेआधीपासून अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या त्यांची मालिका खूपच हिट असून, टीआरपी मध्ये देखील सतत टॉपला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा