Friday, July 5, 2024

‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, अनिरुद्ध आणि संजनाची मजेशीर लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेंडिंगला आहेत. पण यातील एक मालिका मात्र चांगलीच धुमाकूळ घालत आहे. ती म्हणजे ‘आई कुठे काय करते’ होय. या मालिकेतील कथा आणि पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटली आहेत. या मालिकेत आता अनेक ट्विट्स येत आहेत. त्यामुळे ही मालिका चांगलीच रंगात आली आहे. या मालिकेतील अनेक सीनवरून नेटकऱ्यांनी अनेक मीम्स तयार केले आहेत. अशातच या मालिकेत एक नवीन वळण आले आहे.

या मालिकेत सध्या अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाला आहे. अरुंधती तिच्या आईकडे राहायला गेली आहे. त्यामुळे आता संजना अनिरुद्धसोबत लग्न करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. त्यात आता संजनाचा देखील घटस्फोट झाला आहे, त्यामुळे आता तिला असं झालंय की, ती कधी एकदा अनिरुद्धसोबत लग्न करून देशमुखांची होईल. जरी अनिरुद्धच्या घरच्यांचा या गोष्टीला विरोध असला, तरीही ते दोघे लग्न करणार आहेत. अशातच त्यांच्या लग्न पत्रिकेवरून एक मीम चांगलेच व्हायरल होत आहे. (aai kuthe kay karte : aniruddh and sanjna’s funny wedding card viral on social media)

इंस्टाग्रामवर एका मीम पेजवरून ही पत्रिका व्हायरल झाली आहे. तुम्ही पाहू शकता की, ही पत्रिका अत्यंत मजेशीर पद्धतीने डिझाईन केली आहे. या पत्रिकेमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांची नाव लिहिली आहेत. तसेच विवाहस्थळ संजना ठरवेल तिथे, असे लिहिले आहे. विवाह मुहूर्त शेखर यायच्या आधी. तसेच सन्माननीय उपस्थितीत अरुंधतीचे नाव लिहिले आहे. मानाची कलवरी विशाखा, तर ईशा, यश आणि अभिषेक यांची नावे लिहून आमच्या ‘पप्पांच्या लग्नाला यायचं हं’ असे लिहिले आहे.

त्यांची ही मजेशीर लग्नपत्रिका सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. सर्वत्र या पत्रिकेची चर्चा चालू आहे. तसेच नेटकरी देखील या पोस्टवर अत्यंत मजेशीर अंदाजात कमेंट करत आहेत. एका युजरने “जेवणाचं काय?” अशी कमेंट केली आहे. अशा अनेक मजेशीर कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

आता या मालिकेत नक्की होणार आहे. हे येत्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याआधी देखील या मालिकेतील अनेक सीनवरून मीम्स तयार झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….

-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

हे देखील वाचा