नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. आज २१ व्या शतकात जगताना जिथे स्त्री समुद्राच्या तळापासून ते अवकाशापर्यंत सर्व काही मुठीत घेत आहे, त्याच काळात स्त्रीवर अनेकदा दूषणं देखील लावली जातात. आशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील आणि खरंच आजची स्त्री स्वतंत्र, स्वावलंबी झाली आहे का? हा विचार आपल्याला करायला भाग पाडतील. आता तुम्ही म्हणाल असे का बोलताय? मात्र याला कारण आहे. सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात आई कुठे काय करते? ही मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाचे भाग प्रदर्शित केले जात आहे.
या भागांचे प्रोमो सध्या व्हायरल झाले आहे. हे प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेत सुरु असणाऱ्या या ट्रॅकला आणि कलाकारांना ट्रोल केले आहे. एवढ्या मोठ्या वयात लग्न कोण करते आणि का करावे? मालिकेत काहीही दाखवता. आदी अनेक प्रश्न विचारून लोकांनी वहिनीला, मालिकेला आणि कलाकारांना ट्रोल केले आहे. या ट्रोलर्सला आता मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुंधतीने अर्थात मधुराणी प्रभुलकरने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये. पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं. हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”
मधुराणीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील त्यांची सहमती दर्शवली आहे. तुझे अगदी याबरोबर असून, आम्ही तुझ्या मताशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान ही मालिका सध्या टीआरपी रेसमध्ये अव्वल असून, चालू ट्रॅकमुळे तर मालिकेची लोकप्रियता अधिकच वाढली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण