Tuesday, July 9, 2024

‘ओमकार स्वरूपा’, म्हणत ‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधतीने केले गणरायाचे स्वागत

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. तसेच मालिकेची कहाणी देखील खूप वेगळी आणि वास्तविक आहे. मालिकेची खासियत म्हणजे मालिकेतील प्रत्येक पात्राला त्याची एक विशेष ओळख आणि स्थान आहे. यातील मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले हिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील तिच्या समंजस आणि वैचारिक पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेत आपण अरुंधतीला अनेकवेळा गाणे गाताना पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, वैयक्तिक आयुष्य देखील ती एक खूप चांगली गायिका आहे. बाप्पाची प्रार्थना करताना मधुराणीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मधुराणीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्या मागे गणपती बाप्पा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या अरुंधती या पात्राच्या गेटअपमध्ये आहे. यावरून असा अंदाज लावू शकतो की, ती मालिकेच्या सेटवर आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिच्या सुमधुर आवाजात ‘ओमकार स्वरूपा’ हे गाणे गात आहे.

https://www.instagram.com/reel/CToSYVJF1YJ/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्थ, अनाथच्या नाथा तुझ नमो.” या व्हिडिओवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांना तिचा आवाज आवडला आहे. तर अनेकजण तिला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत आहेत. (Aai kuthe kay karte fame actress madhurani Gokhale share her singing video on social media )

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमाला कोणतीही सीमा नसते! ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत बांधली लग्नगाठ

-मराठी कलाकारांच्या घरात झाली श्रींची स्थापना, फोटो शेअर करून दाखवली बाप्पाची झलक

-मराठी कलाकारांच्या घरी झाले गणरायाचे आगमन, सुंदर फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

हे देखील वाचा