मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, रुपालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. रूपालीने तिच्या इंंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये रूपाली भोसले ( rupali bhosle ) एखाद्या वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे दिसते. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक नवीन स्टाइल दिसून येत आहे. तसेच, तिच्या हातात एक स्क्रिप्ट दिसते. रूपालीने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्ही तुमचे भविष्य ठरवू शकत नाही. तुम्ही तुमची आवड ठरवू शकता आणि तुमची आवड तुमचं भविष्य ठरवतात. ” या कॅप्शनमुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चाहते तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अनेक अंदाज लावत आहेत.
रूपालीच्या या पोस्टववर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियार व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टव कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तुमच्या स्वप्नांच्या घोड्याचा लगाम नेहमी हातात धरून ठेवा, नाहीतर पुन्हा पुन्हा सुटेल.” तर आणखी एकाने लिहिले की,”माझी सुंदर राणी” तर अनेकांनी तिला तिच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
रूपाली सध्या मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या “आई कुठे काय करते” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती संजना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करतात. रूपालीने “आई कुठे काय करते” या मालिकेपूर्वी “तुझ्या माझ्या संसाराला” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत तिने अरुणा ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचेही प्रेक्षक कौतुक करतात.
आधिक वाचा-
–पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार पुन्हा अडचणीत, ट्रोलर्सने घेतला चांगलाच क्लास
–नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या ‘गडकरी’चा टिझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ