‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अशात या मालिकेतील गाैरी ही व्यतिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री गाैरी कुलकर्णी हिच्याबाबात माेठी बातमी समाेर येत आहे. अभिनेत्रीचा काही दिवसांपुर्वी अपघात झाला असून या अपघातात अभिनेत्री गंभीररित्या जखमी झाली आहे.
स्टार प्रवाह वाहिणीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील गाैरी आणि यशची जाेडी प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र, काही दिवसांपुर्वी झालेल्या या अपघातामुळे गाैरी पुढील काही दिवस मालिकेत दिसणार नाहीये. गाैरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने धडक दिली आहे.
View this post on Instagram
माध्यमातील वृत्तांनुसार, अभिनेत्री जात असलेल्या मार्गावर एक अज्ञात बाईकस्वार भरधाव वेगात उलट मार्गाने आला आणि त्याने गाैरीच्या स्कुटीला समाेरुन धडक मारली. यामुळे अभिनेत्रीची स्कुटी रस्त्यावर स्लीप झाली. परिणामी गाैरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाल असून तिला आणखीही छाेट्या दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे डाॅक्टारांनी गाैरीला तीन आठवडे सक्तीचा आराम करायला सांगिला आहे.
View this post on Instagram
गाैरीच्या अपघाताची बातमी ऐकून तिचे चाहते चिंतेत पडले आहे आणि तिला काळजी करण्याचा सल्ला देत आहेत. त्याचबराेबर तिचे शुभचिंतक ती लवकर बरी व्हावी म्हणून प्राथनाही करत आहेत. अशात गाैरीने मालिकेच्या शूटिंगमधून हल्ली ब्रेक घेतला असला, तरी ती लवकरच तिच्या चाहत्यांना भेटण्यासाठी मालिकत परतणार आहे. (aai kuthe kay karte fame gauri kulkarni had severe accident `see her health update)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
Birthday Special : ग्लॅमरच्या जगापासून निवृत्ती घेतलेल्या तनुश्री दत्ताचा ‘असा’ आहे चित्रपटसृष्टीतील प्रवास
धक्कादायक! महेश मांजरेकरांच्या सिनेमाच्या शुटींगवेळी मोठा अपघात, 19 वर्षीय तरुण किल्ल्यावरुन दरीत कोसळला अन्…