Saturday, July 6, 2024

‘अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं…’, मिलिंद गवळी यांनी शेअर केली ‘ती’ पोस्ट

‘आई कुठे काय करते’ ही टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त गाजत असलेली मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलेच स्थान निर्माण केले असून, टीआरपीच्या रेसमध्ये देखील ती सर्वात वर असते. मालिकेचा विषय जरी कधी कधी सामान्य लोकांच्या आयुष्याशी मिळता जुळता असला तरी त्यात दाखवण्यात आलेली प्रत्येक गोष्टी खरंच असेल असे नाही. अनेकदा मालिकांमध्ये दाखवली अतिशयोक्ती कलाकारांना देखील आवडत नाही. मात्र केवळ नाइलाज म्हणून किंवा कथेची, त्या पात्राची गरज म्हणून ते काम करत असतात. प्रेक्षकांप्रमाणे कलाकार देखील त्यांच्या स्वतःच्या भूमिकेबद्दल त्यांचे मतं व्यक्त करत असतात. मात्र असे खूपच कमी कलाकार असतात जे स्वतः त्यांचे खरे मतं जगासमोर मांडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी देखील अशीच एक पोस्ट नुकतीच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्यानी त्यांचा अरुंधतीवर ओरडत असल्याचा एक व्हिडिओ शेअर करत एक मस्त पोस्ट लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये अनिरुद्ध अरुंधतीवर चिडून जोरजोरात ओरडत असल्याचे आपल्याला दिसते. मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “अनिरुद्ध अरे थांब जरा थांब , किती बोलतोयस”
खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात ,किती मनाला लागेल असं बोलतात ,कशाचाच भान ठेवत नाही ,समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत , याचं कसलंच भान नाही या माणसाला, मग अशा माणसाची चीड नाही येणार का.?

बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते. अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय. पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं?

काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे. बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं , न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे,

पहिल्या एपिसोड मध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय. सांगायचा मुद्दा काय आहे की , त्यांनी ही बडबड केल्यानंतर जे काय डोक्याचा भुगा होतो , तो कसा निस्तारायचा, तर शांत बसायचं. Meditation करायचं, पूर्वी बरं होतं , एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती, तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं , छान वाटायचं, ति जवळ येऊनच बसायची, तिच्या बरोबर माझं डोकं शांत व्हायचं. पण काय सगळ्यांना कुत्रे ,मांजरी ,पक्षी ,प्राणी आवडत नाहीत. त्यांच्यापैकी एक एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्ये मध्ये यायची म्हणून, त्यांना disturb व्हायचं.  These are the realities of life…पण मग हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही”.

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की कलाकार रील लाइफमध्ये ज्या भूमिका साकारतात त्याचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावर किती मोठा आणि खोलवर परिणाम होतो ते. अनिरुद्धवर स्वतः मिलिंद गवळी देखील चिडतात. सीन झाल्यानंतर त्याची बडबड ऐकून त्यांना त्रास देखील होतो, मात्र यातही त्यांनी कसे स्वतःला बॅलन्स करायचे ते शोधले होते, मात्र आता ते देखील त्यांना जमत नसल्यचे त्यांनी सांगितले. मिलिंद गवळी हे मागील अनेक वर्षांपासून सिनेविश्वात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम कामे केली असून, आई कुठे काय करतेमुळे तयां अमाप लोकप्रियता मिळाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये कदाचितच खरं प्रेम…
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा

हे देखील वाचा