Tuesday, June 24, 2025
Home मराठी नकारात्मक भूमिका करूनही चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून भारावलेल्या मिलिंद गवळी यांनी शेअर केली ‘ती’ पोस्ट

नकारात्मक भूमिका करूनही चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून भारावलेल्या मिलिंद गवळी यांनी शेअर केली ‘ती’ पोस्ट

मराठी मनोरंजनविश्वातील प्रतिभासंपन्न अभिनेते म्हणून मिलिंद गवळी यांची ओळख आहे. मराठीसोबतच हिंदी आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी उत्तम काम करत नावलौकिक कमवला. सध्या ते स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या सुपरहिट मालिकेमध्ये ‘अनिरुद्ध देशमुख’ ही भूमिका साकारत आहे. त्यांची ही भूमिका नकारात्मक असली तरी लोकांना ती खूपच आवडत आहे. या मालिकेने त्यांना एक वेगळी ओळख आणि अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सध्या त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही अनिरुद्ध म्हणूनच ओळखले जाते.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ते सतत त्यांच्या मनातील विचार, भावना, मत मांडत असतात. ते अनेकदा त्यांच्या मालिकेबद्दल देखील त्यांचे मत मांडतात दिसतात. मिलिंद गवळी यांना मोठी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर वर त्यांना असंख्य लोकं फॉलो करतात मात्र प्रत्यक्ष आयुष्यात देखील त्यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांचा अभिनय आवडणारे अनेक लोक आहे. याचा नुकताच प्रत्यय त्यांना आला. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. मिलिंद गवळी एकविरा आईच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढली तर काहींनी फोटो काढले. याचा एक अनुभव त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.

मिलिंद गवळी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “प्रेम – आतहा प्रेम – असीम प्रेम.आपली माणसं आपल्यावर प्रेम करतातच, जन्माला आल्या आल्या सगळ्यांना आपल्यावर प्रेम करायला आई असते,जिच्या प्रेमाची तुलना होऊ शकत, त्यामुळे आपण सगळेच जन्माला आल्यापासून आपल्यावर अतोनात प्रेम करणारा एक तरी व्यक्ती असतोच असतो, ती म्हणजे आपली आई…..आणि मग वडील असतात, प्रत्येकाला ही दोन माणसं तर असतातच , निस्वार्थ प्रेम करणारी,मग नातेवाईक आले, आजी आजोबा आले, आपल्या आईचे आई वडील आणि मग वडिलांचे, नातवावर प्रेम करायला,मग काका काकू मावश्या मामा मामी आल्या, ते पण आपल्यावर प्रेम करतात, मग भावंड आले, सख्खे चुलत मावस, मग कौटुंबिक मित्रमंडळी पण असतात प्रेम करणारे.”

पुढे मिलिंद यांनी लिहिले, “जन्माला आल्यापासून कमी जास्त प्रमाणात हे बेसिक लोकं असतात आपल्यावर प्रेम करणारे.जस जसे आपण मोठे होत जातो, आपल्या स्वभावावर लोकं ठरवतात , याच्यावर आता प्रेम करायचं की नाही ते, म्हणजे बघाआमच्या कुटुंबात एक लहान मुलगा होता, त्यांच्या घरी कोणीही पाहुणा आला की तो अचानक त्यांच्या मुस्कटात मारायचा, आणि जर त्या पाहुण्यांनी त्याला परत एकदा त्यांच्या मुस्कटात मारून दिलं नाही तर भोकाड पसरायचा,Naturally आम्हच्या कुटुंबातले फार कमी पाहूणे त्या मुलावर प्रेम करायचे,पण काही बाळं समंजस होती ,रडायची नाही ,हट्ट करायची नाही ,शांत असायची, ती बाळा बर्याच लोकांची लाडकी असायची.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

ते स्वतः लहान असताना कसे होते याबद्दल त्यांनी लिहिले, “मी काय घरातल्यांना कोणाला फार त्रास दिला नाही फक्त माझा एकच प्रॉब्लेम होता की दार उघडलं की मी घराच्या बाहेर पळायचो, दिवसभर भटकायचो , आणि कुठल्यातरी मुलाशी मारामारी करून यायचो, त्याची आई माझी तक्रार करायला घरी यायची आणि मग आईच्या हातचा मार खायचो, बरं मी मार पण शांतपणे खायचो,आरडाओरडा करायचा नाही, पळून जायचं नाही, हँगर सांडशी लाटणं जे आईच्या हातात येईल ते अंगावर झेलायचं आणि गप्प बसायचं, मग आईलाच खूप वाईट वाटायचं, आणि मग पुन्हा माझे लाड व्हायचे.”

अनिरुद्ध सारखी भूमिका करूनही त्यांना लोकांचे मिळणारे प्रेम पाहून भारावलेल्या मिलिंद यांनी लिहिले, “सगळ्यांनीच माझे खूप खूप लाड केले, पण मी लाडावलो नाही, पण लाड करून घ्यायची सवय मात्र लागली,काही बिचारे खूप दुर्दैवी असतात, आयुष्यामध्ये त्यांचे फार कमी लाड होतात किंवा होतच नाहीत.प्रेमाशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,कलाकार पण बहुतेक मी यासाठी झालो असेन.प्रेमाला ही खरंच नशीब लागतं कारण अनिरुद्ध सारखा toxic डोक्याने सटकलेलं कॅरेक्टर करतोय, तरीसुद्धा लोकांचं मला भरभरून प्रेम मिळत आहे, लोकं अनिरुद्ध चा द्वेष करतात पण मिलिंद गवळी वर प्रेम करतात. माझ्यासाठी हेच यश आहे, या सगळ्यांच्या प्रेमाने मला समृद्ध केलं.”

मिलिंद गवळी यांनी अनेक मराठीमध्ये मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आई कुठे काय करते या मालिकेने त्यांना एका वेगळ्या उंचीवर आणि यशाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा