आपण अनेकदा देवाकडे ‘लहानपण देगा देवा’ असे महंत आपले बालपण पुन्हा मागत असतो. कारण बालपणात जी मजा, मोकळीक मिळते ती मोठे झाल्यावर नाही मिळत. लहान असताना प्रत्येक गोष्ट करायला एक वेगळीच मजा येते. मोठे झाल्यावर प्रत्येक गोष्ट आपण करूच शकतो असे नाही. अनेक गोष्टींवर मर्यादा येत असल्यामुळे प्रत्येक जणं मोठे झाल्यावर या ना त्या मार्गाने जमेल तसे आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत असतो. असेच कलाकार देखील करतात. ते अशा बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याच्या गोष्टींमध्ये तरी कसे अपवाद ठरतील. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने देखील नुकतेच असे काही केले जे आपण बहुतकरून लहान असतानाच करत असतो. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. मधुराणी सोशल मीडियाच्या माध्यातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
View this post on Instagram
मधुराणी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती झोपाळ्यावर बसून झोके घेत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ तिच्या लेकीने शूट केला आहे. झोका झुलायला कोणाला आवडत नाही. लहान असताना आपण सर्वच नेहमी झोका झुलतो, मात्र मोठे झाल्यावर फार क्वचित अशी वेळ येते आणि आपण झोक्यावर बसतो. मधुराणीने देखील नुकताच झोक्यावर बसून झोका झुलायचा आनंद घेतला.
याचा एक व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “झोका…झोपाळा, झुला लहानपणापासून मला वेड आहे ह्याचं. उंच उंच झोके घ्यायला मला प्रचंड मजा येते. झोक्यावर मी अक्षरशः मला विसरते. आणि तेच वेड माझ्या लेकीमध्ये पण आलंय. आपला जीव दडपावा इतके उंच झोके ती घेते. हा व्हिडीओ पण तिनीच काढलाय. तिलाही ह्यातलं सुख कळलंय….. ह्याचं मला सुख आहे”. या व्हिडिओमध्ये मधुराणी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पडद्यावर नेहमी साडीत वावरणारी अरुंधती प्रत्यक्ष आयुष्यात स्टायलिश आहे. हेच यावरून स्पष्ट होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद
शाहरुखचा जुना फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पाहा कसे दिले अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर