Wednesday, July 2, 2025
Home मराठी ‘आई कुठे काय करते’मालिकेतील अरुंधतीचा ‘तो’ व्हिडिओ आला चर्चेत, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

‘आई कुठे काय करते’मालिकेतील अरुंधतीचा ‘तो’ व्हिडिओ आला चर्चेत, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेतील सगळेच पात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगवली आहेत. मालिका केवळ एका कोणत्याही पात्राला मध्यवर्ती न ठेवता सगळ्याचा पात्रांना समान महत्व दिले आहे. मालिकेत अनेक वळणं येत आहेत. खास म्हणजे मालिकेतील प्रत्येक वळण प्रेक्षकांना देखील आवडत आहे. मालिकेत मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतून एक वास्तविकता दाखवण्याचा निर्मात्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. मालिकेत सध्या मधुराणीने आपल्या पहिल्या म्युझिक अल्बमचे रेकॉर्डिंग केले आहे. खऱ्या आयुष्यात देखील ती खूप गाणे गाते. मधुराणीने नुकतेच तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचे हे गाणे आणि व्हिडिओ देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

मधुराणीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, “मुझे जा न काह मेरी जा.” तिचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. सगळेजण तिच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CabYQNHgjbN/?utm_source=ig_web_copy_link

तिचे ‘सुखाचे चांदणे’ हे गाणे अनेकांना आवडले आहे. खास म्हणजे हे गाणे तिच्या आवाजात आहे त्यामुळे सगळ्यांना ते जास्त आवडले आहे. मालिकेत सध्या अरुंधतीने देशमुखांचे घर सोडले आहे. ती घटस्फोटीत असल्यामुळे तिला दुसरे घर देखील मिळत नाही. परंतु या सगळ्यात आशुतोष तिला घर शोधण्यास मदत करतो. तसेच दुसरीकडे समृद्धी बंगल्यात रुपाली कांचन आजीचे कान भरते. त्यामुळे कांचन देखील तिचा राग राग करत आहे. तसेच आता त्या दोघी मिळून अरुंधतील घरावरील हक्क सोडण्यास सांगणार आहेत.

मालिकेत रुपाली भोसले नकारात्मक भूमिकेत आहे. नकारात्मक भूमिकेत असूनही तिचे पात्र सगळ्यांना आवडत आहे. मालिकेत आणखी उत्कंठावर्धक वळणं येत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा