Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री रुपाली भोसलेला ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर झाली दुखापत, सोशल मीडियावरून दिली माहिती

सध्या छोट्या पडद्यावर ‘आई कुठे काय करते’ मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्ठान निर्माण केले आहे. दमदार भूमिका आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली असून मालिकेतील संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला (Rupali Bhosale) सेटवर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या बातमीने मालिकेच्या प्रेक्षकांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. रुपालीच्या कसदार अभिनयामुळे ही भूमिका घराघरात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. संजनाच्या भूमिकेतील रुपालीच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. अभिनयाइतकीच रुपाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. यावरुनच रुपालीने तिला दुखापत झाल्याची माहिती शेअर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर रुपालीने तिच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती शेअर केली आहे.

यादुखापतीबद्दल अधिक माहिती देताना रुपालीने सांगितले की, “मी मिलिंद गवळीसोबत एका सीनसाठी शूटिंग करत होते. ज्यामध्ये अनिरुद्ध संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे आणि तो संजनावर ओरडतो. त्यानंतर मी रडते आणि खुर्चीवर बसते. असा सीन शूट करायचा होता. दिग्दर्शक रवीने मला खुर्चीवर बसायला सांगितले सीन करत असताना मी रडत होते आणि मी इतका जोरात खाली बसले की माझ्या पायाचे बोट पूर्णपणे वळले आणि संपूर्ण नखं बाहेर आलं. त्यातून रक्त येऊ लागले होते पण मी लाल रंगाची नेलपॉलिश लावली होती त्यामुळे मला वाटले की ते नेलपॉलिश आहे. नंतर मला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आम्ही चित्रीकरण थांबवले. मी पाहिलं तेव्हा पायाला खूप मोठी दुखापत झाली होती.”

पुढे बोलताना रुपाली म्हणाली की  “त्यावेळी सेटवर डॉक्टरही उपलब्ध नव्हता त्यामुळे मला लवकर उपचार करता आले नाहीत. मला प्रचंड वेदना होत होत्या मात्र आता मी बरी असून महत्वाचे सीन शूट करायचे असल्याने दुखापतीमुळे शूटिंग थांबवण्यात आले नाही .” दरम्यान अभिनेत्री रुपाली भोसलेने बिग बॉस २ मध्येही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. याआधी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री रुपाली भोसलेने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा