Saturday, June 29, 2024

‘धनंजय माने विथ वरजिनल अशोक सराफ’, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट ठरतेय लक्षवेधी

मराठी सिनेसृष्टीतील विनोदसम्राट अशोक सराफ यांनी ४ जून रोजी आपली ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छाही दिलेल्या. दरम्यान झी मराठीने त्यांची पंचाहत्तरी साजरी करण्यासाठी नेटकऱ्यांना अशोक सराफ यांच्यावर मीम्स बनवण्याचं चॅलेंज दिलं होतं.

या चॅलेंजमध्ये तीन विजेते निवडण्यात आले. विजेत्या पेजच्या ऍडमिन्सला अशोक सराफांची त्यांच्या घरी भेट घेण्याची संधी मिळाली. त्यातील एक विजेता ‘आम्ही मेमकर’ (aamhimemekar) हे पेज ठरले.

त्यानिमित्ताने या पेजच्या ऍडमिनने ‘लहानपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालंय’, असं म्हणत मोठी भावूक पोस्ट लिहिली आहे.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा