आमिर खान (Aamir khan) आणि करिश्मा कपूरने (karishma kapoor) अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रिन जोडी अनेक चाहत्यांना आवडते. त्यांच्या गोड रोमान्सने लाखो चाहत्यांना त्यांच्याकडे आकर्षित केले आहे. त्या दोघांचे ऑफस्क्रीन बॉंडींग देखील खूप सुंदर आहे. आमिर खान हा करिश्मा कपूरला इंप्रेस करण्यासाठी जोकर देखील बनला होता. अशातच मंगळवारी (14मार्च)ला आमिर त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया हा रंजक किस्सा…
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमिर खानलआ करिश्मा आवडायला लागली होती. करिश्माला इंप्रेस करण्यासाठी आमिर खान काहीही करायला तयार होता. त्यामुळे तो एकदा जोकर देखील झाला होता. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात करिश्मा कपूरच्या मित्रांच्या सांगण्यानुसार त्याने लाल रंगाचा सूट घातला होता तसेच तोंडाला जास्त पावडर लावली होती. हे सगळं पाहून करिश्मा कपूर खूप हसली होती. (Aamir Khan and Karishma kapoor Raja Hindustani movies scene)
आमिर खानला या गोष्टीचे खूप वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आले. आमिर खान तिथून जाणार होता तेवढ्यात करिश्मा कपूरला तिच्या चुकीची जाणीव होते. तो तिला म्हणतो की, “मी वेडा आहे ना.” यावेळी करिश्मा म्हणते की, “,वेडा नाहीतर साधा आहेस तू.” हे ऐकून आमिर खूप खुश होतो आणि तिच्यावर फिदा होतो. अशाप्रकारे इथून पुढे त्यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.
‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटातील गाणी, डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. ‘आये हो मेरी जिंदगी में’, ‘परदेसी’ या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावले होते. तसेच त्यांची लव्हस्टोरी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजही इतक्या वर्षांनी प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतो.(aamir khan and karishma kapoor raja hindustani movies scene)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’
मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन