Saturday, March 15, 2025
Home कॅलेंडर Birthday Special | आमिर खानबद्दल ‘या’ 5 गोष्टी ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण

Birthday Special | आमिर खानबद्दल ‘या’ 5 गोष्टी ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) हा हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी आमिर खान प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळेच त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. मंगळवारी (13 मार्च)ला आमिर खान आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. मात्र असे अनेक किस्से या प्रतिभावान अभिनेत्याबद्दल आहेत, जे कोणालाही माहित नाहीत जाणून घेऊ या अशाच काही  गोष्टी. 

आमिर खान हा हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेली तीन दशके त्याने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. आमिर खानने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून चित्रपट जगतात दमदार पदार्पण केले होते. जाणून घेऊया आमिर खानबद्दल माहित नसलेल्या गोष्टी.

वडीलांची चित्रपटात काम करण्यास नव्हती परवानगी
सध्या बॉलिवूडमध्ये आमिर खानइतका यशस्वी अभिनेता कोणाीच नसेल. आमिर खान म्हणजे चित्रपट सुपहहिट ठरणारच, असा विश्वास प्रत्येकाला असतो. हे त्याच्या अभिनयाचे मोठे यश आहे. मात्र आमिर खानच्या वडीलांचा मात्र चित्रपटात काम करण्यास नकार होता. आपल्या मुलाने कधीही अभिनेता म्हणून काम करू नये अशीच त्यांची इच्छा होती.

टेनिसमध्ये आमीर खानला करायचे होते करिअर
अभिनेता आमिर खानला लहानपणापासूनच टेनिस खेळण्याची आवड होती. तो शालेय जीवनात उत्तम टेनिसपटू होते. त्याने कॉलेजामध्ये असताना अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. रॉजर फेडरर हा आमिर खानचा आवडता टेनिसपटू आहे.

पहिल्या चित्रपटाचे स्वत: चिकटवले होते पोस्टर
आमिर खानने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक झाले होते. मात्र खूप कमी जणांना हे माहित आहे की, चित्रपटाचे बजेट कमी असल्याने आमिर खानने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर सगळीकडे चिकटवले होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यास लावत नाही हजेरी
अभिनेता आमिर खान हा चित्रपट जगतातील कोणत्याही पार्टीला किंवा पुरस्कार सोहळ्यास कधीच हजेरी लावत नाही. ‘घायल’ चित्रपटासाठी अभिनेता सनी देओलला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने अशा कार्यक्रमांना जाणे बंद केले होते.

अंघोळ करणे नाही आवडत
सुपरस्टार आमिर खानबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, त्याला अंघोळ करायला आवडत नाही. याचा खुलासा स्वत: आमिर खानने एका कार्यक्रमात केला होता.(aamir khan birthday 5 unknown facts about actor)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भज्जीची लव्हस्टोरी: मित्राने करुन दिली होती गीता बसराशी ओळख, मात्र तिने दिला होता लग्नाला नकार

आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच

हे देखील वाचा