Wednesday, June 26, 2024

आमिर खानच्या अफेअरमुळे झाला किरण रावसोबत घटस्फोट? अभिनेत्याने सांगितली सत्यता

मागील काही दिवसांपूर्वी आमिर खानने तो त्याची पत्नी किरण रावपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या १५ वर्षांनी त्याने हा निर्णय घेतल्याने सगळेच हैराण झाले होते. याआधी देखील आमिर खानचा एकदा घटस्फोट झाला होता. किरण ही त्याचंही दुसरी पत्नी परंतु त्याने हा निर्णय घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा प्रेमविवाह झाला असूनही त्यांनी हा निर्णय कसा घेतला असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. आमिर सोमवारी (१४ मार्च) रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांचे हे नाते का आणि कसे तुटले.

अशी माहिती समोर आली आहे की, आमिरचे बाहेर अफेअर चालू असल्याने त्याने त्याचे लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. आमिर खानने आता या सगळ्या अफवांवर प्रत्युत्तर दिले आहे आणि खरे सांगितले आहे. आमिर खानने त्याच्या मुलाखतीत सांगितले की, “त्याची पहिली पत्नी रीनासोबत त्याचा घटस्फोट किरणमुळे झाला नाहीये. तससह त्याच्या घटस्फोटाला इतर कोणताही व्यक्ती यासाठी जबाबदार नाहीये. हो त्यावेळी मी किरणला ओळखत होतो परंतु तिच्यामुळे माझा रिनासोबत घटस्फोट झाला नाही. तेव्हा देखील या सगळ्याला कोणीही कारणीभूत नव्हते आणि आता देखील नाहीये.”

आमिरने पुढे त्याच्या आणि किरणच्या घटस्फोटाबाबत सांगितले की, “किरण आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही एकमेकांचा खूप आदर देखील करतो आणि आम्ही एकमेकांना खूप आवडतो. परंतु मला माहित आहे की, लोकांना आमचे नाते समजणार नाही. लोकांना हे समजणे खूप अवघड आहे. कारण की, लोकांना असा बॉन्ड पाहायला मिळत नाही. मी आणि किरण याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा करत होतो. आम्ही एकमेकांना आमचे कुटुंबच मानतो. मग ते किरणने आई वडील असो, तिचा भाऊ असो किंवा बहीण असो. फक्त आमच्या नात्यात बदल होणार आहे. आम्ही आमच्या लग्नाचा खूप आदर करतो. आम्ही सोबतच पुढे जाणार आहोत आणि सोबतच काम करणार आहोत. पाणी फाउंडेशन पुढे नेणार आहोत. आम्ही आजही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो.”

त्याने पुढे सांगितले की, “मला असे वाटते की, मला खूप भाग्यवान आहे. कारण माझी पहिली पत्नी रीना होती. त्यावेळी मी खूपच तरुण होतो. आम्ही सोबतच म्हातारे झालो. एवढंच काय तर घटस्फोट झाल्यावर आजही आम्ही एकत्रच आहोत.”

अशाप्रकारे आमिर खानने त्याच्या आयुष्यातील स्त्रियांचा आदर करून त्यांच्यापासून लांब होण्याचे नेमके कारण काय होते हे स्पष्ट केले. तसेच त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय हा त्याने स्वतः घेतला होता हे सांगितले. आमिर खानने त्याच्या करिअरमध्ये खूप यश मिळवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा