Saturday, June 29, 2024

तो किस्सा जेव्हा रेल्वेमधून थोडक्यात बचावला होता आमिर खान, ‘या’ चित्रपटादरम्यान झाला असता भयंकर अपघात 

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे चित्रपटामधील एखादे पात्र निभावत असताना स्वत:ला पुर्ण पणे त्या पात्रात झोकुन देऊन काम करतात. अशाच उत्तम कामीगिरीसाठी ओळखला जाणारा आमिर खान अशा कारणांसाठी सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. इंडस्ट्रीमध्ये 26 वर्षांच्या कारकीर्दीत आमिर खानने असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यांच्याशी स्पर्धा करणे अशक्य आहे.

‘दंगल’ चित्रपटामध्ये कुस्ती पैलवान दिसण्यासाठी वजन वाढवणे असो किंवा वयाच्या 50 व्या वर्षीही महाविद्यालयीन तरूण मुलासारखा दिसणे असो. तो प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करतो. यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. पण चित्रपट परिपूर्ण बनवण्याच्या प्रक्रियेत आमिर खान अनेक वेळा अपघातांना बळी पडला आहे.

 

गुलाम चित्रपटादरम्यान अभिनेता आमिर खानचा प्रचंड मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात आमिर मरता मरता वाचला होता. चित्रपटाची शुटिंग रेल्वेच्या रुळावर सुरु असताना धावत्या रेल्वे समोर झेंडा घेऊन जायचे होते. तर रेल्वे जवळ येण्याअगोदर रुळावरुन खाली उडी मारावी लागणार होती. पण हा सीन शुट करताना आमिरच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता.

सीन आणखी चांगला बनवण्यासाठी, आमिर खानने डबल बॉडी वापरण्यास नकार दिला आणि तो सीन स्वतः शूट करण्यासाठी खाली गेला. सीन शूट करण्यासाठी कॅमेरा फिरवला आणि आमिर रुळावर धावू लागला. रेल्वे वेगाने त्याच्या जवळ येत होती. फक्त काही सेकंद शिल्लक होते आणि तितक्यात आमिरने रुळावरून उडी मारली. त्यावेळी सेटवर उपस्थित सर्व लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता.

आमिर सुद्धा क्षणभर प्रचंड घाबरला होता. सुदैवाने आमिर त्या अपघतातून वाचला, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, यापूर्वी बॉलिवूडमध्ये व्हीएफएक्स आणि ऍनिमेशन वापरले जात नव्हते. यामुळे, कलाकार एकतर स्वतः स्टंट सीन शूट करायचे किंवा त्यांच्यासाठी डबल बॉडी वापरली जायची.

आमिर खान आणि राणी मुखर्जी यांनी 1998 साली ‘गुलाम’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. रिलीझ झाल्यानंतर या चित्रपटाने तरुणांना वेड लावले आणि त्यातील ‘आती क्या खंडाला’ हे गाणे इतके हिट झाले की आजही चाहते ते विसरू शकले नाहीत.(aamir khan briefly escaped from the train a major accident occurred during the movie yaa)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर आढळल्या जखमा

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा