Wednesday, June 26, 2024

“मग मी भारत का सोडू?” म्हणत आमिर खानने दिले त्याच्या ‘त्या’ विवादित व्यक्तव्यावर स्पष्टीकरण

बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा उत्तम कलाकारांबद्दल आणि अभिनयाबद्दल बोलले जाते तेव्हा एक नाव प्रकर्षाने घेतले जाते आणि ते म्हणजे आमिर खान. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या कमालीच्या प्रभावी अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहे. त्याचा सिनेमा हिट होणार हे आधीच सांगितले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून त्याला देखील अपयश येत आहे. अनेकदा त्याला देखील त्याच्या व्यक्तव्यांमुळे वादांमध्ये अडकावे लागले आहे. एकदा त्याने देश सोडण्यावर एक विधान केले आणि त्यानंतर तो मोठ्या वादात अडकला.

झाले असे की, आमिर खानने २०१५ मध्ये एका मुलाखतीदरम्यान असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून त्याची एक्स पत्नी किरण रावने मुलांच्या चिंतेमुळे देश सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या या विधानावरून संपूर्ण देशात एकच गदारोळ झाला. त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर त्याने त्याच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण देखील एका शोमध्ये दिले होते. त्याचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे त्याने सांगितले.

आमिर म्हणाला होता की, “मी या देशातच जगणार आणि इथेच मारणार. त्या वेळेला किरणने आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत भावनेत ती बोलली. इंडस्ट्रीत मी एकमेव असा अभिनेता आहे, ज्याचे भारताबाहेर एकही घर नाही. माझ्याकडे जी काही घरं आहेत ती भारतातच आहेत, मग मी का भारत सोडून जावू? माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि अतिशयोक्ती करण्यात आले.”

दरम्यान आमिर खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर मागच्या वर्षी तो, ‘लाल सिंग चढ्ढा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या अतिशय वाट पाहणाऱ्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. बॉलीवूड बॉयकॉट ट्रेंडचा आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाला मोठा फटका बसला. त्यानंतर अजूनतरी आमिरने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी

पदार्पणातच फिल्मफेयरचा पुरस्कार जिंकणाऱ्या मिस युनिव्हर्स लारा दत्ताचे वैयक्तिक आयुष्य राहिले नेहमीच चर्चेत

हे देखील वाचा