Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड “मी झाेपायचाे नाही, बेशुद्ध व्हायचाे” – आमिरच्या आयुष्यातला काळा काळ !

“मी झाेपायचाे नाही, बेशुद्ध व्हायचाे” – आमिरच्या आयुष्यातला काळा काळ !

आमिर खाननं (Aamir Khan)नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, रीना दत्तशी (Reena Dutta) घटस्फाेट झाल्यावर ताे खूपच खचून गेला हाेता. ताे इतका दुखी झाला हाेता की, राेज दारु प्यायचा आणि कधी कधी पिताना बेशुद्ध व्हायचा.

आमिर खान बॉलीवुडमधला असा अभिनेता आहे जाे जे मनात येईल ते खुलेपणानं बाेलताे. ताे आपल्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल बाेलायला घाबरत नाही. अलीकडच्या एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ ताे हाेता, जेव्हा त्याची पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फाेट झाला. त्या घटनेनंतर ताे खूपच खचला हाेता. त्यानं सगळी कामं बंद केली हाेती आणि फक्त दारु प्यायला लागला हाेता. ताे इतका दारु प्यायचा की बेशुद्ध व्हायचा.

आमिर खाननं ‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यात आलेल्या त्या कठीण काळाविषयी बाेललं. त्यानं असंही सांगितलं की, त्या काळात काही बॉलीवुड स्टार्स त्याला भेटायला त्याच्या घरी आले हाेते.

आमिर खान म्हणाला, “रीना गेल्यानंतर जेव्हा घरी काेणीच नव्हतं, तेव्हा मला खूप एकटं वाटायचं. काय करावं हेच कळत नव्हतं. मग एका दिवशी मी दारुची बाटली उघडली आणि ती सगळी पिऊन टाकली. आणि मग जवळपास दीड वर्ष रोज रात्री असंच करत राहिलो. मी झोपायचो नाही, दारू पिऊन बेशुद्ध व्हायचो.”

आमिर खान म्हणाला, “त्या काळात माझी आणि जूही चावलाची काहीच बोलचाल नव्हती, जवळपास सात वर्षं आम्ही एकमेकांशी बोललो नव्हतो. पण जेव्हा तिला माझ्या आणि रीनाच्या ब्रेकअपबद्दल कळलं, तेव्हा ती मला भेटायला आली. अचानक तिचा फोन आला. ती म्हणाली, मला तुला भेटायचंय. मी म्हणालो, ये ना. ती माझ्या घरी आली आणि म्हणाली, मी पेपरमध्ये वाचलं की तुझं आणि रीनाचं ब्रेकअप झालंय, तुम्ही वेगळं राहायला लागलात. मी म्हणालो, हो. ती लगेच म्हणाली, हे खूपच चुकीचं झालंय. मला काय झालंय ते ऐकायचं नाहीये, पण तू काही करून पुन्हा जुळवून घे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

या अभिनेत्रीला बनायचे होते आयएएस अधिकारी; ओघओघाने आली सिनेसृष्टीत…

हे देखील वाचा