Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

इरा खानला युजरने विचारला विचित्र प्रश्न; आमिर खानच्या लाडकीने ‘असे’ दिले प्रत्युत्तर, मराठी भाषेवरही झाली व्यक्त

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी इरा खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही. पण तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा काही कमी नाही. इरा सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी नुकतीच इराने सोशल मीडियावर त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यादरम्यान एका युजरने तिला एक विचित्र प्रश्न विचारला, त्यानंतर तिने त्या युजरला चांगलेच प्रत्युत्तर दिले.

एका युजरने इंस्टाग्रामवर इरा खानला विचारले की, “तू आमिर खान सरांचा मुलगा आहेस का?” या प्रश्नाच्या उत्तरात इराने लिहिले, “मी त्यांची मुलगी आहे, पण तुम्ही हे कोणत्या प्रकारच्या लिंग नामाचा वापर करत आहात.” त्याचवेळी एका युजरने विचारले, “मराठी बोलता येते का? कारण तुमचा प्रियकर नुपूर एक महाराष्ट्रीयन आहे.” प्रत्युत्तरात इरा म्हणाली, “नाही. पुन मी समजू सकतो.”

अभिनयाबद्दल इराचे मत
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एकदा इरा म्हणाली होती की, “मला अभिनयाची आवड नाही. स्टेज आणि कॅमेऱ्यामागे काम करायला मला नेहमीच आवडते, पण त्याच्यासमोर नाही. ऍक्शन फिल्म वगळता मला कधीच अभिनय करण्याची इच्छा झाली नाही. कारण ऍक्शन फिल्ममधून मी मस्त स्टंट करणे शिकू शकते.”

बॉयफ्रेंडसोबत बॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
काही काळापूर्वी इराने तिचा बॉयफ्रेंड नुपूरसोबत बॉक्सिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. इराच्या या व्हिडिओमध्ये ती नुपूर शिखरेसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे, पण यादरम्यान अचानक नुपूरला तिच्यावर प्रेम येते. प्रथम ती मोठ्या उत्साहाने बॉक्सिंग करत असते, परंतु नंतर सॉरी म्हणत नुपूरला मिठी मारते.

इराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इरा बर्‍याचदा वडील आमिरसोबत मुंबईत स्पॉट होते. सोशल मीडियावर ती आमिरसोबत मजेदार फोटोही शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शर्टलेस’ आयुषमान खुरानावर फिदा झाली त्याचीच पत्नी! फोटो शेअर करत म्हणाली…

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

हे देखील वाचा