Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड नैराश्यानंतर आमिर खानच्या लेकीला ग्रासले ‘या’ मोठ्या आजाराने, पोस्ट शेअर करत इरा खानने दिली माहिती

नैराश्यानंतर आमिर खानच्या लेकीला ग्रासले ‘या’ मोठ्या आजाराने, पोस्ट शेअर करत इरा खानने दिली माहिती

आमिर खानची मुलगी इरा जरी बॉलिवूडमध्ये नसली तरी तिची लोकप्रियता आणि फॅन फॉलोविंग कोणत्याही मोठया अभिनेत्रीला मात देईल अशीच आहे. त्यामुळे इराबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायला फार आवडते. इरा बॉलिवूडमध्ये नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती सतत तिच्या आयुष्याशी संबंधित विविध गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असते. इरा तिच्या लव्हलाईफमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. मात्र आता इरा एका वेगळीच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे, आणि ती गोष्ट म्हणजे इराला झालेला आजार.

हो काही काळापूर्वीच इराने तिला डिप्रेशन झाले आणि त्यातून ती बाहेर देखील आली असल्याचे सांगितले होते. मात्र आता पुन्हा इराने तिला अजून एका आजाराने ग्रासले असल्याचे सोशल मेंदुवर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. या पोस्टमधून इराने तिला इन्झायटी अटॅकस सुरु झाल्याचे सांगितले आहे. इराने तिचा एक मिरर सेल्फी फोटो शेअर करत याबद्दल सांगितले आहे. इराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आता मला इन्झायटी अटॅकस सुरु झाले आहेत. मला खूप भीती वाटते आणि मी कधी पण रडायला लागते. मला नाही माहित पॅनिक अटॅक कसे असतात.”

पुढे इराने लिहिले, “मला जेवढे पॅनिक अटॅकबद्दल माहित आहे त्याची शारीरिक लक्षणं म्हणजे श्वास जोरात होतो, ठोके वाढतात, रडायला येते, आणि हे हळूहळू हे वाढत जाते. असे वाटते जसे काही भयानक घडत आहे. ही खूपच भीतीदायक भावना असते, अशा परिस्थितीत लोकांना खूपच अत्याचार होत असल्याचे जाणवते. मला झोपायचे आहे, मात्र या अटॅकसमुळे मला झोप येत नाही. अशावेळेस मला नुपूरसोबत बोलून श्वासाचे व्यायाम करून काही तासांसाठी बरे वाटते. जर तुम्ही सावधान राहण्याचा प्रयत्न करत असला तर या गोष्टींकडे लक्ष द्या.”

तत्पूर्वी इरा नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे चर्चेत असते. इरा ही नुपूर शिखरेला डेट करत असून त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा