Saturday, June 29, 2024

बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन

बॉलिवूडमधील अतिशय हुशार आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून आमिर खानची ओळख आहे. आपल्या परफेक्ट स्वभावामुळे तो अतिशय प्रसिद्ध आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक हुशार व्यक्ती देखील आहे. त्यामुळे तो नेहमीच त्याच्या चित्रपटांस्तही विविध प्रयोग करतो, शकली लढवत असतो. त्याच्या या गोष्टी काम करतात आणि त्याचे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरतात. मात्र असे नेहमीच होते असे नाही. काही वेळा गोष्टी उलट्या पडतात आणि सगळे काही फास्ट. असेच काहीसे सध्या आमिर खानच्या बाबतीत चालू आहे. त्याचा अतिशय गाजावाजा केलेला सिनेमा म्हणजे ‘लालसिंग चड्ढा’. या सिनेमाला ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा मोठा फटका बसला आणि चित्रपट दणक्यात आपटला.

सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खानने एका खासगी कार्यक्रमात अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. मात्र आता आमिर खान या सगळ्यापासून दूर नेपाळमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे. एका रिपोर्टनुसार आमिर खान नेपाळला गेला असल्याचे सांगितले जात आहे. आमिर नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूच्या बुधानिलकंठा येथील एका विपश्यना केंद्रात काही दिवस राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तो तिथे १० दिवसांच्या मेडीटेशन प्रोग्राममध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता आमिर तिथे एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोणी आहे, याबद्दल माहिती उपलब्ध झालेली नाही.

मागच्या काही काळापासून आमिर खानचे नाव सतत नाव आणि त्याचे फ्लॉप सिनेमे यांमुळेच गाजताना दिसत आहे. २०१८ साली आलेल्या ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’पासूनच आमिर खानचे चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप व्हायला सुरुवात झाली. ‘लाल सिंग चड्ढा’ देखील तुफान गाजत असताना फ्लॉप झाला. दरम्यान १०० कोटी क्लबची सुरुवात आमिर खाननेच केली होती. आता या मेडिटेशनमध्ये त्याच्या चुका त्याला समजाव्या आणि पुन्हा एका नवीन आणि हटके सिनेमात आमिर दिसावा यासाठी त्याचे फॅन्स त्याला शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदवार्ता! धर्मेंद्रचा नातू ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात, प्रेयसी द्रीशासोबत घेणार सात फेरे

रविवारी जलसाचे गेट चाहत्यांसाठी बंद, बिग बींनी चाहत्यांना दिला माेठा इशारा, जाणून घ्या कार

हे देखील वाचा